Hingoli Politics : ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या भेटीमुळे हिंगोलीसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या नेत्यांची गुप्त बैठक झाल्यानं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
CBI ची मोठी कारवाई, NEET प्रकरणात आणखी एकाला अटक; वाचा सविस्तर
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संतोष बांगर आणि आष्टीकर यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. आता हे दोन्ही नेते सत्तारांच्या निवासस्थानी भेटलेत. सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती आहे. सत्तार, बांगर आणि आष्टीकरांच्या हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. अधिवेशन काळात ही भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुनगंटीवार कार्यक्षम मंत्री म्हणूनच महाराष्ट्रात राहिले; जयंत पाटलांनी जखमेवर मीठ चोळलं
दरम्यान, आष्टीकर, बांगर आणि सत्तार यांच्या भेटीमुळं हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता बोलली जात आहे. मात्र, या भेटीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
लोकसभेच्या निवडणुकीपासून हिंगोली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. या ठिकाणी तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केल्याने शिंदे गटाने बाबुराव कोहळीकर यांना तिकीट दिले होतं. मात्र बाबुराव कोहळीकर यांचा पराभव झाला. नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांचा पराभव केला होता. आता नागेश पाटील आष्टीकर, बांगर यांची भेट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या गुप्त भेटीचा नेमका फायदा कोणत्या गटाला होणार आणि कोणत्या गटाचे नुकसान होणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, नागेश पाटील आष्टीकरण यांनी या भेटीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, मी लोकप्रतिनिधी आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मला पालकमंत्र्यांना भेटावं लागणारच आहे. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली. मतदारसंघातील काम निमित्ताने ही भेट होती, असं ते म्हणाले.