मुनगंटीवार कार्यक्षम मंत्री म्हणूनच महाराष्ट्रात राहिले; जयंत पाटलांनी जखमेवर मीठ चोळलं

मुनगंटीवार कार्यक्षम मंत्री म्हणूनच महाराष्ट्रात राहिले; जयंत पाटलांनी जखमेवर मीठ चोळलं

Jayant Patil On Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार हे कार्यकक्ष मंत्री आहेत, म्हणूनच महाराष्ट्रात राहिले असल्याचं म्हणत आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार राहिलेले मुनगंटीवार पराभूत झाले आहेत. त्यानंतर आता विधानसभेच्या अधिवेशनात बेकायदेशीर मासेमारीवर चर्चा करताना जयंत पाटील यांनी मुनगंटीवारांवर टोलेबाजी केलीयं.

टाटा इंन्सिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ पदासाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा पारित करण्याची मागणी केलीयं. बेकायदेशीर मासेमारीमुळे पारंपारिक मासेमारीवर परिणाम होत असून मागील दहा वर्षांपासून मी ही मागणी करीत असल्याचं नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यावर प्रत्युत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकार विचारार्थ असून लवकरच आमदारांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचं प्रत्युत्तर दिलंय.

Salman Khan: भाईजानचा ‘हा’ मोठा चित्रपट रिलीज आधीच वादात अडकला, चाहत्यांना करावी लागणार प्रतीक्षा

दरम्यान, आमदार नितेश राणे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनीही बेकायदेशीर मासेमारीबद्दल भाष्य केलंयं जयंत पाटील म्हणाले,बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी समुद्रात गस्तीसाठी बोटी फिरत असतात. या बोटीमधून गस्त घालणारे अधिकारी आधुनिक मासेमारी करणाऱ्यासोबत समुद्रातच डील करीत असतात. त्यामुळे गस्तीसाठी फिरत असलेल्या बोटींमध्ये वाढ करुन या बोटींमध्ये पारंपारिक मासेमारी करणारा एक माणूस ठेवावा, यासोबतच बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांना अटक होऊन 2 वर्षे तुरुंगवास झाला पाहिजे, असा कायदा करावा. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आमचा खूप विश्वास आहे. मुनगंटीवार हे कार्यक्षम मंत्री आहेत, म्हणूनच तुम्ही महाराष्ट्रात राहिले आहात त्याचा आम्हाला आनंदच असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
आधुनिक मासेमारी करणाऱ्यांना सरकारकडून आकारण्यात आलेला 5 ते 6 लाख रुपये दंड भरणे हे परवडत आहे. एलईडी मासेमारी लोकं एकदा समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेल्यास जवळपास 10 लाख रुपयांचे मासे घेऊन येतात. त्यामुळे त्यांना दंड भरणं परवडत आहे. राणेंच्या लक्षवेधीनंतर किनारपट्टीवरील आमदारांची बैठक घेऊन आधुनिक मासेमाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज