टाटा इंन्सिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ पदासाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?
TISS Mumbai Recruitment 2024 : सामाजिक आणि संशोधन क्षेत्रातील टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (Tata Institute of Social Science) ही एक महत्वाची संस्था आहे. याच संस्थेअंतर्गत ‘प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर’ (Project Coordinator) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. दरम्यान, या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज कसा करावा? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? याच विषयी जाणून घेऊ.
“मी नाराज नाही, आम्ही महायुतीतच” विधानपरिषदेत संधी हुकल्यानंतरही जानकर खुश?
पदांचा तपशील-
प्रकल्प समन्वयक पदासाठी एकूण 1 रिक्त पदांची भरती केली जाईल.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
Samriddhi Accident : समृद्धी महामार्गावरील ‘तो’ भीषण अपघात, वडेट्टीवार विधानसभेत आक्रमक
शैक्षणिक पात्रता-
प्रकल्प समन्वयक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सोशल वर्क/सोशल सायन्स/कौन्सिलिंग मानसशास्त्र/मानसिक आरोग्य या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
पगार-
प्रकल्प समन्वयक पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला प्रति महिना २४,०००/- पगार दिला जाईल.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अधिकृत वेबसाइट लिंक –
https://www.tiss.edu/project-positions/
अधिसूचना –
https://www.tiss.edu/uploads/files/vacancy_Advert-UMang-2.pdf
अर्ज प्रक्रिया –
प्रकल्प समन्वयक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना या पदभरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतरच आपला अर्ज भरावा. कारण, अर्ज भरतांना अर्जात कोणत्याही चुका राहिल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा. नोकरीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.