Download App

गालावरुन वारं गेलं, चांगली वाणी बंद, धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करा; महंत नामदेव शास्त्रींकडून पाठराखण

गालावरुन वारं गेलं, चांगली वाणी बंद, धनंजय मुंडेसाठी प्रार्थना करा, या शब्दांत भगवान बाबा गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आमदार धनंजय मुंडे यांची पाठराखण केलीयं.

Namdev Shashri Maharaj On Dhananjay Munde : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गालावरुन वारं गेलंय, चांगली वाणी बंद पडली, त्यांनी पुन्हा पहिल्या पदावर येऊन त्यांच्या हातून समाजकल्याण घडो अशी प्रार्थना करा, असं आवाहन भगवान बाबा गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांनी (Namdev Shashri Maharaj) केलयं. यासोबतच भगवान गडासोबत छेडछाड करू नका असंही ते यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे आता नामदेव शास्त्री यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भगवान बाबा जेव्हा मारतात. तेव्हा त्या काठीचा आवाज येत नाही, असंही नामदेव शास्त्री यांनी यावेळी म्हटलं आहे. बीडमध्ये आयोजित प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते.

मराठी यायलाच पाहिजे पण, हिंदी ही देशाची भाषा… फडणवीसांचा हिंदीला फुल सपोर्ट

पुढे बोलताना महंत नामदेव शास्त्री म्हणाले, बीडचे भूमिपुत्र धनंजय मुंडे या कार्यक्रमाला येणार होते. ते दोन तास हेलकॉप्टरच्या शेजारी बसले पण त्यांना क्लिअरंस मिळाला नाही, कार्यक्रमाला त्यांना येता आलं नाही त्यांचा दौरा रद्द झालायं. धनंजय मुंडे हे भगवान गडाचेच आहेत ते तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, त्यांच्यासाठी आपण मोठा कार्यक्रम करु. धनंजय मुंडे यांच्या गालावरुन वारं गेलंय, सर्वांनी प्रार्थना करा की, त्यांची चांगली वाणी जी बंद पडलीयं ती सुरु व्हावी ते पुन्हा पहिल्या पदावर येऊन
त्यांच्या हातून समाजकल्याण घडावं, असं आवाहन नामदेव शास्त्रींकडून करण्यात आलंय.

ब्रेकिंग : आता पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य; भाषा वादात फडणवीस सरकारने जारी केला मोठा आदेश

तसेच भगवान बाबा गडावर समाज एकत्र राहतो. कोणीही गडावर खडे टाकू नका. हा वारकरी संप्रदाय जातीपातीच्या पलीकडचा आहे. कोणीही गडाची छेडछाड करु नका. भगवान बाबा जेव्हा पाहतात तेव्हा आईच्या डोळ्यातून आलेलं प्रेम पाझरतं असं दिसतं पण ते जेव्हा मारतात ना तेव्हा छडीचा आवाज येत नाही पण जीवन उध्वस्त होतं, असं नामदेव शास्त्रींनी स्पष्ट केलंय.

follow us