Download App

समाजाचे प्रश्न मांडा, पण जातीय सलोखाही गरजेचा; ओमराजे निंबाळकरांनी जरांगेंना ठणकावलं

Omraje Nimbalkar यांनी केलेल्या वक्तव्यावरून मनोज जरांगे आक्रमक झाले होते. त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना सल्ला देत प्रत्युत्तर दिले.

Omraje Nimbalkar advice to Manoj Jarange : ‘जरांगे हे मराठा समाजाचे प्रश्न मांडताय मात्र जातीय सलोखा टिकणे देखील तेवढेच गरजेचे आहे.’ असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे. दरम्यान जरांगे (Manoj Jarange) हे दोन दिवसांपूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या याच वक्तव्यावरून आक्रमक झाले होते. त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना हा सल्ला देत प्रत्युत्तर दिले.

ओबीसी अन् मराठ्यांबाबत माझ्याशी बोललेलं पवारांनी जनतेला सांगावं; लक्ष्मण हाकेंचा नवा बॉम्ब

नेमकं प्रकरण काय?

ओमराजे निंबाळकर यांनी वक्तव्य केलं होतं की, आरक्षण हे केंद्र सरकारच्या हातात आहे त्यामुळे केंद्र सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी निंबाळकर यांनी केली होती. त्यांच्या याच वक्तव्यावर मराठी समाजाने आक्रमक होत थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्याचबरोबर जरांगे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, आमच्या मागण्या कळत नसतील तर खासदारांनी गप्प बसावे.

तुम्हाला माहितेय का? लग्नामुळे मिळतात अनेक आर्थिक फायदे; कसं ते जाणून घ्या

त्यावर आता ओमराजे निंबाळकर म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी जसा तमिळनाडू राज्यात निर्णय घेतला गेला तसा महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्राने करावा. संसदेत पहिला आरक्षणाचा मुद्दा हा मी मांडला होता. केंद्र सरकारने आरक्षणात लक्ष घालावं. मराठा समजाला आरक्षणाची गरज का आहे हे पटवून दिल पाहिजे. मनोज जरांगे पाटील पण सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. मराठा समाजाचे प्रश्न मांडतायेत. मात्र जातीय सलोखा टिकवणं हे गरजेचं आहे…

follow us

वेब स्टोरीज