तुम्हाला माहितेय का? लग्नामुळे मिळतात अनेक आर्थिक फायदे; कसं ते जाणून घ्या

तुम्हाला माहितेय का? लग्नामुळे मिळतात अनेक आर्थिक फायदे; कसं ते जाणून घ्या

Financial benefits of getting married : भारतीय परंपरेत लग्नाला पवित्र बंधन मानलं जातं. ते दोन जिवांच नव्हे तर दोन कुटुंबाचं मिलनही समजलं जातं. लग्नाला सात जन्माचं नातं मानलं जातं. पण, तुम्हाला माहितीय आहे का की, लग्न हे तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतं. लग्नाचे अनेक आर्थिक फायदे आहेत. लग्नामुळं तुम्हाला आयकर (Income tax) वाचवायलाही मदत मिळते. गुंतवणूकीचेही पर्याय उपलब्ध असतात. दरम्यान, लग्न केल्यानंतर कोणते आर्थिक फायदे मिळतात? याच विषयी जाणून घेऊ.

ओबीसी अन् मराठ्यांबाबत माझ्याशी बोललेलं पवारांनी जनतेला सांगावं; लक्ष्मण हाकेंचा नवा बॉम्ब 

लग्नामुळे वाचतो आयकर
जर तुम्ही विवाहित असाल तर आयकर कायद्यात अशा अनेक तरतुदी आहेत ज्या तुम्हाला  करात सवलत देतात आणि तुमची बचत वाढतात.

गृहकर्जाच्या व्याजावर मिळते सुट
आयकर कायद्यानुसार, जर गृहकर्जाच्या मुद्दल आणि व्याजाच्या रकमेवरही करात सुट मिळते. विवाहित लोकांना यामध्ये मोठा फायदा होतो. जर तुमचं संयुक्त गृहकर्ज असेल तर त्यात 50-50 टक्के भागीदारी असेल तेव्हा 80C सीमधून तुम्हाला गृहकर्जाच्या मूळ रकमेवर 1.5 लाख रुपयांची सूट 3 लाख रुपयांपर्यंत वाढून मिळते. जर तुम्ही लग्नानंतर गृहकर्ज घेतले असेल, तर 24B नुसार, 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याज भरपाईवर कर सवलत दुप्पट होते.

वैद्यकीय किंवा आरोग्य विमा
आयकरामध्ये, आरोग्य विमा घेतला असेल तर त्यावरही करात सूट मिळते. कलम 80(डी) अंतर्गत, जोडीदारांपैकी एक काम करत असल्यास, त्याला कमाल 25,000 रुपयांपर्यंतच्या प्रीमियम पेमेंटवर कर सूट मिळते. दोन्ही काम करत असल्यास, ही सूट 50,000 रुपयांपर्यंत वाढते.

मुलाचं शिक्षण
साधारणपणे, केवळ विवाहित जोडप्यांनाच या कर सवलतीचा लाभ मिळतो. 80 (सी) अंतर्गत, जर पती-पत्नी दोघेही करदाते असतील, तर मुलांच्या शिक्षणासाठी कराच्या सवलतीची मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत मिळते.

लिव्ह, ट्रॅव्हल्स लाऊंस
जर पती-पत्नी दोघेही करदाते आणि नोकरी करत असतील, तर ते 4 वर्षांच्या कालावधीत LTA चा लाभ घेऊन एकूण 8 टूरचा आनंद घेऊ शकतात. तुमचा आयकर एलटीएच्या पैशावर तुम्ही वाचवू शकता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज