Pankaja Munde : बीड लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणेंनी (Bajrang Sonavane) भाजपच्या पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. हा पराभव पंकजा मुंडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. याच पराभवातून अंबाजोगाई तालुक्यातील एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
मोदींच्या मंत्रिमंडळातून अजित पवार गटाला डच्चू, काय म्हणाले प्रफुल पटेल?
पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळंअंबा येथील मुंडे समर्थक पांडुरंग रामभाऊ सोनवणेंनी आत्महत्या केली. पांडुरंग सोनवणे यांनी रविवारी सकाळी शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. धक्कादायक बाब म्हणजे निकालाच्या दिवशीच पांडुरंग यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा त्यांना अडवण्यात आल्यानंतर आता पाच दिवसांनी त्यांनी आपलं जीवनं संपवलं. पांडुरंग सोनवणे हे भाजप आणि पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबाकडून सांगितल्या जातं. त्यांच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी, एक मुलगी आणि एक लहान मुलगा आहे.
राज्यमंत्रिपद अमान्य, आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदंच पाहिजे; अजितदादांनी ठरलेलंच सांगितलं
दरम्यान, या घटनेनंतर पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत शांत आणि सकारात्मक राहण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही …मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा..कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे … मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 9, 2024
पंकजा मुडेंनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. स्वत:च्या जीनवाल धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रध्दा नाही… मी लढत आहे, संयम ठेवत आहे. तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने राहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतंय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला खूप अपराधी आणि दुःखी वाटत आहे…. मी पराभव स्वीकारला आहे पचवला आहे. पराभव तुम्हीही पचवा!! अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश अशतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात… शांत आणि सकारात्मक राहा please please.., असे पंकजा मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा… आई बापाला दुःख देऊ नका.. त्यांच्या जीवाला घोर लावू नका.. तुम्हाला शप्पथ आहे..मुंडे साहेबांची…, असं पंकजा म्हणाल्या.