‘बजरंग बली पावला’, जयंत पाटलांनी सोनवणेंचं अभिनंदन करताच पवारही हसले

‘बजरंग बली पावला’, जयंत पाटलांनी सोनवणेंचं अभिनंदन करताच पवारही हसले

Jayant Patil :राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) महायुतीचा धुव्वा उडला. मविआला 30 जागा जिंकता आल्या असून महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. तर बीडमध्ये बजंरग सोनवणेंनी (Bajrang Sonavane) महायुतीच्या तगड्या उमदेवार पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) मोठा मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर आज पक्षांच्या बैठकीत जयंत पाटलांन (Jayant Patil) आमच्या पक्षाला बजरंग बली पावला, असं म्हणत त्यांचं अभिनंदन केलं.

…तर यूपीमध्ये भाजपने ‘या’ 11 जागा गमावल्या असत्या, इंडिया आघाडीचा बसपाने केला खेळ खराब 

खासदार झालेल्या सर्व उमदेवारांची आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी बजरंग सोनवणेंसह सर्वच खासदार मुंबईत आले होते. त्यावेळी बोलतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार गटाच्या निवडून आलेल्या खासदारांचे अभिनंदन. महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाही मोठे यश मिळालं. मविआच्या सर्वच घटक पक्षांनी चांगलं काम केलं. त्यामुळे महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत. पवार साहेबांनी परिश्रम घेतले. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीने महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

Siddharth P Malhotra: दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​यांनी ‘महाराज’ सिनेमाच्या लेखकांच केलं कौतुक, म्हणाले… 

यावेळी पाटील यांनी व्या आठही खासदारांची ओळख माध्यमांना करून दिली. नवनियुक्त खासदार अमर काळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यानंतर जयंत पाटील यांनी बजरंग सोनवणेंची ओळख करून दिली. जायंट किलर, बजरंग बाप्पा सोनवणे याचं मी स्वागत करतो… आमच्या पक्षाला बजरंग बली पावला, असं म्हणताच बैठकीला उपस्थित असलेल्या शरद पवारांसह सर्वच जण हसले. सर्वांना टाळ्यांचा कडकडाट केला.

विशेष म्हणजे शरद पवार यांच्या उजव्या हाताला बजरंग सोनवणेंची खुर्ची असल्याचे राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमात दिसून आले. त्यामुळे शरद पवार गटामध्ये बजरंग बाप्पाला मानाचे स्थान मिळाल्याचे दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज