निलंगा : मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladaki Bahin Yojana) योजनेचे निलंगा विधानसभा अध्यक्ष अरविंद भैया पाटील निलंगेकर (Arvind Bhaiya Patil Nilangekar) यांनी मतदारसंघात एक लाख वीस हजार महिलांचे यशस्वीरित्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले. त्यांचा एकच उद्देश होता की, मतदार संघातील एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही. आज लाखो महिलांच्या खात्यावर पैसे देखील जमा झालेत, त्यामुळे आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकरांची (Sambhaji Bhaiya Patil Nilangekar) मी एकटीच बहीण नाही तर लाखापेक्षा अधिक बहिणींचा आशीर्वाद माझ्या भावाच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन प्राजक्ता मारवा निलंगेकर (Prajakta Marwa Nilangekar) यांनी केले.
काकांनी डोळे वटारल्याने अर्ध्या तासात लग्न मोडलं, राज ठाकरेंचा शरद पवार-अजित पवारांवर हल्लाबोल
आज निलंगा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जन आशीर्वाद प्रचारयात्रे दरम्यान गुऱ्हाळ, जाजनूर, लांबोटा, झरी, आंबेवाडी(अ. बु), हालसी (तू), तांबरवाडी (ह), हलगरा, हंगरगा, शिरसी(ह), माकणी (थोर) या ठिकाणी झालेल्या प्रचारा दरम्यान प्राजक्ता मारवा निलंगेकर बोलत होत्या.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, डॉ. समिधाताई अरविंद पाटील निलंगेकर, माजी जि प उपाध्यक्ष भरतबाई सोळुंके, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष उमाताई मोरे, निलंगा शहराध्यक्ष संध्याताई पाटील, उर्मिला माने, कविता तोष्णीवाल, प्रणिता केदारे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविणाऱ्या आघाडीला त्यांची जागा दाखवा – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मतदारसंघाचा विकास म्हणजे हायवे, रस्ते, विविध इमारती तर आहेतच पण प्रत्येक उंबरठ्याचा विकास झाला पाहिजे. प्रत्येकाचे जीवनमान सुधारले पाहिजे, यावर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा भर आहे. त्याचबरोबर स्त्रियांचे आरोग्य सुधारले पाहिजे यासाठी अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही निलंगा विधानसभा मतदारसंघात काम करीत आहोत.
पुढे बोलताना प्राजक्ता निलंगेकर म्हणाल्या की, मतदारसंघाचे सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याचे सर्वोच्च काम माजी मंत्री-आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले. त्यामुळे या मतदारसंघातील गुन्हेगारीचे प्रमाण 50% ने कमी झाल्याचं सांगत संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी सर्व महिलांनी मतदानरुपी आशीर्वाद द्यावे आणि त्यांना भरघोस मतांनी विजय करावे, असे आव्हान उपस्थित महिलांना त्यांनी केले.