Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या कुटुंबियांच्या काही तक्रारी असल्याचं सांगितलं. चौकशीत दिरंगाई होत असून त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. तसेच बरेच जण कुटुंबाला त्रास देत असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे.
आर्थिक वाद अन् कोयत्याने पाच वार.., शुभदा कोदारे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
आंबेडकरांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी आंबेडकरांनी नवी मुंबईतील अतिप्रसंग झालेल्या मुलीच्या कुटुंबियाचे स्थलांतर करावे अशी मागणी केली. ते म्हणाले, नवी मुंबईमध्ये एका मुलीवर अतिप्रसंग झाला होता. पीडितांच्या कुटुंबियांना त्या जागेत राहायचं नाही, म्हणून त्यांनी त्यांची जागा सरकारला देऊन त्यांना नवीन ठिकाणी सरकारने स्थलांतर करावे, याबाबत धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा, अशी मागणी आंबेडकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांना केली.
आज सह्याद्री बंगल्यावर राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची भेट घेतली.
परभणी प्रकरणातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई, भाऊ आणि काही नातेवाईकांनी दि. ५ जानेवारी रोजी अकोला येथे माझी भेट घेतली होती आणि तपासाच्या संदर्भात काही तक्रारी केल्या होत्या. तसेच या प्रकरणात…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 8, 2025
Delhi Elections : ‘सपा’नंतर CM ममता बॅनर्जींचाही ‘आप’ला पाठिंबा; केजरीवाल म्हणाले, ‘थॅंक्यू दीदी…’
या बैठकीत परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयाबाबतही चर्चा झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंब मला भेटायला अकोल्यात आले होते. त्यांच्या काही तक्रारी होत्या. त्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं आंबेडकर म्हणाले. या प्रकरणाच्या चौकशीत दिरंगाई होत आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना अद्याप मदत मिळालेली नाही. बरेच जण त्या कुटुंबाला त्रास देत आहेत, असा दावाही यावेळी आंबेडकरांनी केला.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आहे. या प्रकरणाचा तपास मंदगतीने सुरू आहे. सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे तसेच सोमनाथचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाल्यामुळे याची चौकशी न्यायालयाने करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली.
तसेच सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी. अनेकजण सूर्यवंशी कुटुंबियांना त्रास देत आहेत, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्याचं आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी मराठी भाषेवर देखील चर्चा केली, ते म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याचा भाषा आणि मातृभाषा म्हणून अभिमान आहे. मराठी भाषेचा घरगुती वापर झालाच पाहिजे. मात्र, देश म्हणून पाहतो, तेव्हा ती राष्ट्रीय भाषेला पर्याय म्हणून पाहू नये, असं आंबेडकर म्हणाले.