Mahadev Jankar Property : महादेव जानकर (Mahadev Jankar) फाटके आले होते, फाटकेच जाणार असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. महायुतीकडून परभणी लोकसभा निवडणुकीच्या (Parbhani Loksabha Election) रिंगणात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आलीयं. जानकरांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलायं. उमेदवारी अर्जासोबत जानकरांनी आपल्या संपत्तीचीही माहिती दिली आहे. यामध्ये महादेव जानकरांकडे अवघी 20 हजार रुपयेच रोकड असल्याची माहिती देण्यात आली आहे.
टायगर श्रॉफने खिलाडीला बनवले एप्रिल ‘फूल’! बडे मियाँसोबत केला असा प्रँक, पाहा व्हिडिओ
महादेव जानकरांनी दिलेल्या अॅफिडिव्हिटनूसार त्यांच्याकडे रोख रक्कम 20 हजार रुपये जंगम मालमत्ता असून ६८ लाख ५४ हजार 700 रुपये इतकी स्थावर मालमत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द खरोखर असल्याचं दिसून येत आहे. यासोबतच महादेव जानकरांनी आपण अविवाहित असल्याची माहिती दिली असून शेती आणि सामाजिक कार्य करत असल्याचं उमेदवारी अर्जामध्ये नमूद केलं आहे.
यासोबतच जानकरांची मंगळवेढ्यात 1 एकर 10 गुंठे शेतजमीन स्वत: खरेदी केलेली असून 3 लाख 10 हजारांत त्यांनी खरेदी केलेली आहे. तसेच पनवेल, कुर्डू म्हाडा, करोडीवाडीत बिगरशेती जमीन भूखंड असल्याचंही जानकरांनी नमूद केलं आहे. जानकरांचं शिक्षण डिप्लोमापर्यंतच शिक्षण पूर्ण झालं असून
त्यांनी इलेक्ट्रीक इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे.
जानकरांसाठी पंतप्रधान मोदींचा खास संदेश…
पंतप्रधान नरेंद्र मोदी रिझर्व्ह बँकेच्या एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले असता त्यांनी निवडणुकीचं काय सुरू आहे याची माहिती विचारली. तुम्ही इथून गेल्यानंतर आम्ही महादेव जानकरांचा फॉर्म भरायला परभणीत जाणार असल्याचं सांगितल्यानंतर मोदी म्हणाले, जानकरांना सांगा, मी त्यांची 18 व्या लोकसभेत वाट पाहतोय. परभणीच्या लोकांना सांगा जानकरांना दिल्लीला पाठवण्याची आता त्यांची जबाबदारी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.मोदींचा संदेश मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. मोदींसाठी जाकरांनासारखा एक खासदार तुम्ही दिल्लीला पाठवणार का? असा देवेंद्र फडणवीसांनी भाषणात बोलताना परभणीकरांना सवाल विचारला आहे.
महादेव जानकरांची मुर्ती लहान पण किर्ती महान आहे. पाच वर्षे माझ्यासोबत त्यांनी काम केलं आहे, त्यांनी कधीच कुरकुर केली नाही. मंत्रिपद असूनही पाच वर्षांत एक रुपयाचा डागही जानकरांवर कोणी लावू शकला नाही. हा नेता फाटकात आला आणि फाटकातच राहिला जन्मभर फाटकातच राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच महादेव जानकरांची श्रीमंती इथल्या दलित भटक्या समाजाच्या मनात आहे. यंदाच्या निवडणुकीत आम्ही मागील वर्षीचा 41 रेकॉर्ड मोडून काढणार असून यावेळी खासदारांमध्ये पंकजा मुंडे आणि रासपचे महादेव जानकरही असणार असल्याचा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.