Omraje Nimbalkar on Indian Railways : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Om Raje Nimbalkar) यांनी रेल्वे डब्यांच्या अवस्थेवर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवर (Indian Railways) जोरदार टीका केली. रेल्वेच्या जनरल डब्यांची अवस्था बघवत नाही. या डब्यातून माणसंच प्रवास करतात की जनावरं करतात हा प्रश्न पडतो. बुलेट ट्रेन (Bullet Train)आणली. वंदे भारत आणली ठीक आहे त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. पण रेल्वेच्या जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या लोकांची व्यथा समजून घेणं गरजेचं आहे. या लोकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जनरल डब्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. त्यांचा प्रवास सुसह्य करणं गरजेचं आहे अशा शब्दांत खा. निंबाळकर यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.
यानंतर त्यांनी रेल्वे प्रवासातील सवलतीचाही मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, पत्रकारांना आधी रेल्वेच्या प्रवासात सूट होती. कोरोनानंतर ही सूट बंद करण्यात आली. मी अनेक वेळा रेल्वे प्रवासातील ही सवलत पुन्हा सुरू करा अशी मागणी केली होती. आता पुन्हा एकदा ही मागणी मा रेल्वे मंत्र्यांना करत आहे. या दृष्टीने सकारात्मक विचार करावा.
खासदार ओमराजे निंबाळकरांनी सभागृह गाजवलं; प्रधानमंत्री पीक विमा योजना नक्की कुणासाठी?
लातूरला एक रेल्वे (Latur) फॅक्टरी आहे. निवडणुकीचं वर्ष आलं की प्रत्येक वेळी त्या फॅक्टरीचं उद्घाटन होतं. आता ही दुसरी वेळ आहे या फॅक्टरीचं उद्घाटन होण्याची. तरी सुद्धा त्या कारखान्यात तयार झालेला रेल्वेचा डबा काही बाहेर पडलेला नाही. उद्घाटन मात्र दोनदा झालं. म्हणून जे काही करायचं आहे ते निवडणूक आणि उद्घाटना पुरतं मर्यादीत न ठेवता त्या रेल्वे कोच फॅक्टरीतून लवकरात लवकर रेल्वे डबे निर्मितीचं काम सुरू करा, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.
शेतकऱ्यांवर अन्याय , पुन्हा ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचा आयोजन करा, अमर काळेंचं थेट मोदींना आव्हान