मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल; एका बांबूमुळे ओव्हरहेड वायर तुटली; वाहतूक अर्धा तास उशीरानं

मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल; एका बांबूमुळे ओव्हरहेड वायर तुटली; वाहतूक अर्धा तास उशीरानं

Mumbai Local Updates :  मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची रखडपट्टी झाल्यानं प्रवाशांना रेल्वे ट्रॅकव्हर उतरून पायपीट करावी लागत आहे. (Mumbai Local) साधारणतः ओव्हर हेड वायरवर बांबू पडल्यानं सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व फास्ट लोकल माटुंग्याला खोळंबल्या आहेत. सर्व लोकल एकापाठोपाठ एक थांबल्या होत्या. (Local) एवढंच नाहीतर काही एक्सप्रेस गाड्याही थांबल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर, वेळत ऑफिस गाठण्यासाठी लोकलमधील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून पायपीट सुरू केली.

सांगलीच्या चांदोली धरणाचा परिसर भूकंपाने हादरला; नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना

माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ जलद मार्गावर सकाळच्या सुमारास इमारतीच्या बांधकामाचे साहित्य पडलं होतं. ओव्हरहेट वायरवर बांबू कोसळल्याचं दिसताच मोटरमनने वेळीच लोकल थांबवल्याने अनर्थ टळला. त्यानंतर मध्य रेल्वेच्या प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि 8.20 मिनिटांनी ओव्हरहेड वायरवर पडलेले बांबू बाजूला केले. त्यानंतर जलद मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र, त्यात बराच वेळ गेल्याने लोकलसेवा 15-20 मिनिटं उशिराने धावत होती. त्यामुळे चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

ऑरेंज अलर्ट जम्मू-काश्मीरमध्ये गंभीर प्रकार समोर; कर्मचारी सरकारचे अन् मदत दहशतवाद्यांना, चौघांवर कारवाई

गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला. आजही हवामान विभागाने मुंबई आणि उपनगराला पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच, यावेळी जोरदार वारे सुटण्याचीही शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube