Download App

राज्यातील भलीमोठी लाचखोरी! 90 लाखांच्या बिलासाठी अडीच लाख मागणारे अधिकारी रंगेहाथ पकडले

Sport Officer ना 90 लाखांच्या बांधकामाच्या बिलासाठी तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना या अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

Sport Officer Arrested by ACB due to taking bribe : परभणीमध्ये राज्यातील सर्वात मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ज्यामध्ये क्रीडा अधिकाऱ्यांना 90 लाखांच्या बांधकामाच्या बिलासाठी तब्बल अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना या अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

क्रीडा अकॅडमीच्या जागेवर स्विमिंग पुलाचं 90% काम पूर्ण झालं होतं. तसेच क्रीडा स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आलं होतं. अशी सर्व 95 लाख रुपये बिल या प्रकरणातील तक्रारदाराचे प्रलंबित होतं. मात्र हे बिल काढण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे आणि क्रीडा अधिकारी नानक सिंग महासिंह बसी यांनी तक्रारदाराला अडीच लाख रुपयांची लाच मागितली होते. यामध्ये नावंदे या स्वतःसाठी दोन लाख रुपये ठेवून घेणार होत्या. तर उरलेले 50 हजार रुपये हे बस्सी यांना देण्यात येणार होते. आपलं बिल निघावं म्हणून सुरुवातीला या तक्रारदाराने एक लाख रुपये दिलेले होते मात्र उर्वरित दीड लाख रुपये देण्यासाठी तक्रारदाराकडे या अधिकाऱ्यांनी तगादा लावला होता.

‘…समाधानी नाही’, आरोपींनी खुनाची कबुली दिल्यानंतर संतोष देशमुखांच्या भावाची प्रतिक्रिया समोर

त्यामुळे संबंधित व्यक्तीने थेट लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला आणि 25 मार्च रोजी हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर 27 मार्चला तक्रारदाराने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी त्या अधिकाऱ्यांकडे उर्वरित काम करून टाका असे म्हटले असता त्यांनी लाज स्वीकारण्यास देखील सहमती दर्शवली. नावंदे यांच्या केबिनमध्येच ही रक्कम स्वीकारण्यात आली आणि याच वेळी एसीबीच्या सापळ्यात हे अधिकारी रंगेहात पकडले गेले.

follow us