Download App

टोपे-लोणीकर वाद विकोपाला! आता बबनराव लोणीकरांच्या घरावर दगडफेक

  • Written By: Last Updated:

जालना : जालन्यात सध्या राजकीय वाद विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे. आज दुपारी माजी आरोग्य मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर आता माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. अचानक आलेल्या अज्ञातांच्या जमावाने लोणीकर व त्यांच्या भावांच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण आहे. टोपे यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप लोणीकर करत आहेत.

ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुलीवरून घेरणाऱ्या खासदार कोल्हेंनाही पोलिसांचे थेट उत्तर; आपण जबाबदार लोकप्रतिनिधी… 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे, भाजपचे बबनराव लोणीकर, शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी १७ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे बँकेचे अध्यक्षपदही वाटून घेण्यात आलं होतं. मात्र, उपाध्यक्षपदावरून या नेत्यांत बिनसले. आणि आज जिल्हा बँकेच्या कार्यालयासमोर टोपे यांच्या गाडीची काच फोडण्यात आली.

Animal च्या लाटेवर भाजप स्वार; ‘या’ गाण्यावर बनवला मोदींचा खास व्हिडीओ… 

गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. अशातच आज आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यावेळी टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. दुपारी टोपे यांची गाडी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात उभी होती. त्यानंतर या गाडीवर दगडफेक करण्यात आली. अज्ञात तरुणांनी टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करून घोषणाबाजी केली. या घटनेत टोपे यांच्या गाडीची काच फुटली असून गाडीजवळ एक लाकडी दांडा व तेलाची बाटलीही सापडली आहे. बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर काठ्या आणि दगडांनी हल्ला केल्याचा आरोप टोपे यांनी केला आहे. त्यानंतर आता लोणीकर यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली.

काही वेळापूर्वी जालना शहरातील बबनराव लोणीकर यांच्या घरावर अज्ञातांच्या टोळक्याने येऊन दगडफेक केली होती. याशिवाय लोणीकर यांच्या भावाच्या घरावरही दगडफेक करण्यात आली. यात घराच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत राजेश टोपे यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केल्याचा आरोप लोणीकर यांनी केला आहे. त्यामुळे लोणीकर विरुद्ध टोपे असा वाद तापल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us