Download App

सतीष भोसलेच्या घरी धाड; वन विभागाला काय सापडलं?, फरार खोक्या पोलिसांच्या जाळ्यात अडकणार

सतीश भोसलेला शिकारीचा नाद आहे. तो हरिण, मोराची शिकार करत असल्याची चर्चा होती. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी

  • Written By: Last Updated:

Satish Bhosale Khokya : बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाकडून छापा टाकण्यात आला. यामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घबाड सापडलं. (Khokya) गुंड सतीश भोसलेचे काही व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण अद्याप तरी भोसलेला अटक झालेली नाही. त्यामुळे खोक्याचे आका त्याला वाचवत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खोक्या हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे.

सतीश भोसलेला शिकारीचा नाद आहे. तो हरिण, मोराची शिकार करत असल्याची चर्चा होती. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भोसलेच्या घरावर धाड टाकली. तेव्हा त्यांच्या हाती घबाड लागलं. सतीश भोसलेच्या घराची तपासणी करण्यात आली. त्यात धारदार शस्त्रं, जाळी, वाघूर आणि बऱ्याच अन्य वस्तू सापडल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. भोसलेच्या घरावरील छाप्यात वन्यजीवांचं मांसही सापडलं आहे. तेदेखील वन विभागाकडून हस्तगत करण्यात आलं आहे.

खोक्या भोसलेवर शिकारीचा आरोप, वनविभागाचा पंचनामा; तपासात आढळल्या धक्कादायक गोष्टी

मोर आणि हरिणाच्या शिकारीसाठी वापरली जाणारी जाळी भोसलेच्या घरी सापडली आहे. वन विभागाचे ४० कर्मचारी भोसलेच्या घरी आहेत. भोसलेच्या घरात सापडलेली धारदार शस्त्रं केवळ प्राण्यांच्या शिकारीसाठीच वापरली जातात. भोसलेनं शिकारीसाठीचं साहित्य, शस्त्रं अन्यत्र लपवल्याची शंका पोलिसांना आहे. त्यामुळे त्या शस्त्रांचा शोध वन्य विभागाचे कर्मचारी घेत आहेत.

सतीश भोसलेनं केलेल्या अमानुष मारहाणीचे व्हिडीओ नुकतेच समोर आले. दिलीप ढाकणे नावाच्या व्यक्तीला त्यानं प्रचंड मारहाण केली. त्यात त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाला. त्यांच्या लेकालाही मारहाण करण्यात आली. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. सतीश भोसले भाजपचा पदाधिकारी आहे. तो धस यांचा निकटवर्तीय आहे. भोसलेवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मारहाण प्रकरणात त्याला अद्याप अटक झालेली नाही.

भोसलेनं शेकडो वन्यजीवांची शिकार केल्याचा आरोप आहे. हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. भोसलेनं २०० हून अधिक हरिण आणि काळवीट मारल्याचा दावा वन्यजीवप्रेमींनी केला आहे. हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडल्याचा आरोप वन्यजीव प्रेमी माऊली शिरसाट यांनी केला आहे.

follow us