Twist in Valmik Karad assault case in jail by Mahadev Gittes claim :संतोष देशमुख खंडणी आणि हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड याला तुरूंगात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. कराडची विरोधक टोळी असलेल्या बबन गित्ते यांच्या गॅंग मधील या जेलमध्ये असलेला आरोपी महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांनी मारहाण केल्याचं समोर आला आहे. कारागृहामध्ये असलेला कायद्यांसाठीच्या फोनवरून हा वाद झाला असे सांगितले जात आहे मात्र आता या प्रकरणावरून ट्विस्ट आला आहे.
आस्था असणारे औरंगजेबाच्या कबरीवर जातील, त्यावरील वाद अनावश्यक; संघाची भाजपला चपराक
मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघं सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. (Ghule ) तसंच, संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरूंगात आहेत. तर बाजूच्या, दुसऱ्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी असून तोही मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत आहे.त्याचबरोबर महादेव गीते हा परळीतील आणखी एक आरोपी आहे. ते दोघे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
चित्रपट गीत, लोकसंगीत, रॉक साँग, नृत्य…हजारो रसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘रसिकोत्सव’ रंगला
वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरूनच आम्हाला मारहाण झाल्याचं महादेव गीते याने माध्यमांना सांगितलं. ते मारहाणीच्या घटनेनंतर बीड कारागृहातून महादेव गीते याच्यासह चार आरोपींची हरसुल कारागृहात रवानगी करण्यात आली त्यावेळी त्याने माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता महादेव गीतेच्या आरोपांनंतर कारागृह अधीक्षकांकडून कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज जारी केले जाणार का? नेमकी मारहाण कुणी कुणाला केली हे समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरेल दरम्यान या प्रकरणावर भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक करायला महादेव गीते आणि अक्षय आठवले कडून मारहाण झाल्याचा दावा केलाय.