आस्था असणारे औरंगजेबाच्या कबरीवर जातील, त्यावरील वाद अनावश्यक; संघाची भाजपला चपराक

Rashtriy Swayansevak Sangh slaps BJP on controversy Aurangzeb’s grave : औरंगजेबाच्या कबरी विरोधात 17 मार्च रोजी नागपुरात बजरंग दल (Bajrang Dal) आणि विश्व हिंदू परिषदेकडून (VHP) आंदोलन करण्यात आले होते मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दोन गटात तुफान राडा झाला आणि या राड्यात पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून औरंगजेबावर आक्रमक पवित्रा घेणाऱ्या भाजप नेत्यांना चांगलीच चपराक लगावली आहे.
काय म्हणाले भैय्याजी जोशी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी सोमवार 31 मार्च 2025 रोजी नागपूरमध्ये एका कार्यक्रमाला लावलेल्या उपस्थिती वेळी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. त्यावेळी त्यांना औरंगजेबाच्या कबरीवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक आहे. त्याचं निधन भारतात झाल्याने त्याची कबर भारतात बनवण्यात आली आहे. त्यामुळे त्यावर ज्यांची आस्था असेल ते त्या कबरीवर जातील. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. त्यांनी अफजल खानाची कबर बनवली होती. ही भारताची उदारता होती. त्यामुळे कबर कायम राहील आणि ज्यांची आस्था असेल ते त्या कबरीवर जातील.
चित्रपट गीत, लोकसंगीत, रॉक साँग, नृत्य…हजारो रसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘रसिकोत्सव’ रंगला
दरम्यान या अगोदर संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी एका कार्यक्रमात त्यांना नागपूर हिंसाचारावर प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले होते. ते म्हणाले होतो की, औरंगजेबाचा मुद्दा आजच्या काळामध्ये संयुक्तिक नाही. त्यामुळे त्यावरून आजच्या काळात हिंसा करणे देखील अयोग्य आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन देणे देखील चुकीचे आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. आंबेकर यांना विचारण्यात आले होते की, औरंगजेबाचा मुद्दा आजच्या काळामध्ये संयुक्तिक आहे का? तसेच औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी का? त्यावनर उत्तर देताना आंबेकर यांनी हे विधान केलं होतं.