शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची एक ऑडिओ क्लिपची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. या ऑडिओ क्लिपमध्ये चंद्रकांत खैरेंनी कार्यकर्त्यांने आवाज कमी म्हणताच डरकाळी फोडली आहे. खैरेंची ही क्लिप सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केलीय. मात्र या क्लिपला लेट्सअप माध्यम दुजोरा देत नाही.
Kirit Somayya : मविआच्या काळात हिरवे झेंडे मिरवण्याची स्पर्धाच; लव्ह जिहादवरून सोमय्यांचा निशाणा
मिळालेल्या माहितीनूसार, एका कार्यकर्त्याने चंद्रकांत खैरेंना फोन करुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची तक्रार केलीय. संदीप गुरमे भ्रष्ट अधिकारी आहे. त्यांनी वाळूचा सत्यानाश केला असल्याचं दानवे म्हणाले होते. पण आता ते अधिकारी क्राईम ब्रॅंचला आलेत.
Kolhapur : स्टेटस, आंदोलन, निदर्शने, दगडफेक अन् लाठीचार्ज… : छत्रपती शाहुंची नगरी का पेटली?
ते आता पूर्ण शहराचा सत्यानाश करतील ना, मग दानवे आता गप्प का बसले बरं? ते फोन पण उचलत नाहीत. तुम्ही त्यांचे मोठे नेते आहेत ना, मग तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे?” अशी तक्रार या कार्यकर्त्याने खैरेंकडे केली.
मंत्रिमंडळ विस्तार छोटेखानी, ‘इतके’च आमदार घेणार शपथ; अनेक इच्छुकांचा होणार हिरमोड
त्यानंतर कार्यकर्त्यांना खैरेंना साहेब तुमचा पहाडी आवाज कमी झालाय. त्यानंतर माझा आवाज कमी झालेला नाही, माझ्याएवढं कोणी बोलतही नाही. हे बघ, व्ह्याव…व्ह्याव… आला का आवाज? असं खैरे म्हणाल्यानंतर कार्यकर्त्यांने एकच हशा पिकवला आहे.
दरम्यान, चंद्रकांत खैरे आणि कार्यकर्त्याच्या संभाषणाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.