मंत्रिमंडळ विस्तार छोटेखानी, ‘इतके’च आमदार घेणार शपथ; अनेक इच्छुकांचा होणार हिरमोड

मंत्रिमंडळ विस्तार छोटेखानी, ‘इतके’च आमदार घेणार शपथ; अनेक इच्छुकांचा होणार हिरमोड

Cabinet expansion : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेरीस निघाला आहे. उद्या (8 जून रोजी) हा विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, आता विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. (The second cabinet expansion of the Shinde-Fadnavis government is also small)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सत्ताधारी गोटातूनच मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी होत आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी असल्याची चर्चा आहे. सोबतच या मुद्द्यांवरून विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. मात्र आता लवकरच शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. सध्याच्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 14 आमदारांनाच मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

‘पवार साहेबांचे डायलॉग सेम, त्यांची स्वप्नं कधीच पूर्ण होत नाहीत’; फडणवीसांचा खोचक टोला

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हे सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येचा विचार करता आणखी 23 जणांना मंत्रीपद दिले जाऊ शकते.

सुरुवातीला 3 मंत्रिपदे रिक्त ठेवून 20 आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता भाजपतील 7 आणि शिंदे गटातील 7 आमदारांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे 4 कॅबिनेट मंत्री, तर 3 राज्यमंत्री असण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेचे देखील 4 कॅबिनेट मंत्री आणि 3 राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube