मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

वादळी पावसाची दाट शक्यता आहे. प्रामुख्याने दक्षिण मराठवाड्यात गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

News Photo   2026 04 24T164528.872

मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा; राज्यातील 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच आता अवकाळी पावसाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची दाट शक्यता आहे. प्रामुख्याने दक्षिण मराठवाड्यात गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. पुढील २४ ते ४८ तास महत्त्वाचे ठरणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह (३०-५० किमी/तास वेग) पावसाची शक्यता आहे.

काही भागांत गारपीट देखील होऊ शकते. सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून येथे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे तर विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम असून अकोला आणि अमरावतीमध्ये तापमान ४४°C च्या पार राहण्याचा अंदाज आहे.

Exit mobile version