पावसाने मराठवाड्याकडं पाठ फिरवल्यान संकट गडद; पीकं लागवडीत 35% तूट, बाधित शेतकऱ्यां प्रशासनाला महत्वाचे आदेश

सर्वेक्षणातून प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत पुढील निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 09T142007.596

महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीचा आढावा (Marathwada) घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाअभावी पिकांचं नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांचं तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पीक-पाण्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक असून या दोन्ही भागांत सरासरीपेक्षा 35% कमी पाऊस झाल्याची माहिती राज्याचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

पावसाची मोठी तूट असल्याने अनेक भागांतील पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी पावसाअभावी पिकं बाधित झाली आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सर्वेक्षणातून प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत पुढील निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पिकं करपली, चारा संपला; मराठवाड्यात शेतकऱ्यांवर उभ्या पिकात जनावरं सोडण्याची वेळ

दरम्यान, मराठवाड्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची स्थितीही गेल्या वर्षीच्या तुलनेत खालावली आहे. विभागातील जायकवाडीसह 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या उपयुक्त 3492.48 दलघमी म्हणजेच 67.73% जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा 96.82% होता. विष्णूपुरीमध्ये सर्वाधिक 94.23% पाणीसाठा असून जायकवाडीमध्ये सध्या 89.97% साठा आहे, तर सीना कोळेगाव प्रकल्प अद्याप कोरडाच आहे.

धरणनिहाय पाणीसाठा

जायकवाडी , 89.97
निम्न दुधना , 22.49
येलदरी , 62.52
सिध्देश्वर , 35.06
माजलगाव , 25.90
मांजरा , 12.26
पेनगंगा , 68.93
मानार , 61.44
निम्न तेरणा , 24.27
विष्णूपुरी , 94.23
सीना कोळेगाव , 00.00
एकूण , 67.73

follow us