चर्चा तर होणारचं! कर्मचाऱ्यांना 5-10 टक्के अन् पंतप्रधानांना थेट 64 टक्के पगारवाढ….

PM Salary Hike सामान्य कर्मचाऱ्यांसाठी काही टक्के पगारवाढ मिळवणेही मोठे आव्हान असताना पंतप्रधानांच्या वेतनात तब्बल 64 टक्क्यांची वाढ

  • Ninad K
  • Written By: Published:
PM Lawrence Wong Salary Hike

PM Lawrence Wong Salary Hike By 64 Percent : नोकरी करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांसाठी वर्षभराच्या कामगिरीनंतर मिळणारी 5, 10 किंवा 15 टक्के पगारवाढही मोठी गोष्ट असते. काही ठिकाणी तर अपेक्षित पगारवाढीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. महागाई, EMI, घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि रोजच्या वाढत्या खर्चाचा ताळमेळ साधताना मिळणारी काही टक्के वाढही कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. मात्र, दुसरीकडे पंतप्रधानांच्या पगारात थेट 64 टक्के वाढ झाली आहे. या वाढीनंतर पंतप्रधानांच्या खात्यात किती पगार येणार? त्याबद्दल जाणून घेऊया…

महिन्याला 4 लाख पगार, अडीच लाखांची बचत, तरीही मूल नको; होम लोन कपल्सच्या आनंदावर विरजण?

घसघशीत पगार वाढ झालेले पंतप्रधान कोण?

थोडी-थोडकी नव्हे तर, तब्बल 64 टक्के पगार वाढ झालेला हा प्रकार भारतात नव्हे तर सिंगापूरमध्ये झाला आहे. पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या पगारात तब्बल 64 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांना मिळणारी सिंगल डिजिट पगारवाढ आणि देशाच्या पंतप्रधानांच्या वेतनात झालेली मोठी वाढ यातील फरक चर्चेचा विषय ठरला आहे.

PM वोंग यांच्या पगारात 64% वाढ; आता वर्षाला मिळणार 26.9 कोटी

सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या वेतनवाढीसंदर्भातील विधेयक 8 सप्टेंबर 2026 रोजी संसदेत मंजूर करण्यात आले. या निर्णयानुसार 15 ऑक्टोबर 2026 पासून त्यांच्या नव्या वेतनाची अंमलबजावणी होणार आहे. वोंग यांचे वार्षिक वेतन सध्या 2.2 दशलक्ष सिंगापूर डॉलर आहे. 64 टक्के वाढीनंतर ते 3.6 दशलक्ष सिंगापूर डॉलर, म्हणजे भारतीय चलनानुसार सुमारे 26.9 कोटी रुपये वार्षिक होणार आहे. म्हणजेच, सामान्य कर्मचाऱ्यांसाठी काही टक्के पगारवाढ मिळवणेही मोठे आव्हान असताना सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या वेतनात एका निर्णयाने तब्बल 64 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सामान्य कर्मचाऱ्यांना किती पगारवाढ मिळते?

सामान्य कर्मचाऱ्यांची वार्षिक पगारवाढ अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यामध्ये कर्मचाऱ्याची कामगिरी, कंपनीचा नफा, महागाई, उद्योगाची परिस्थिती आणि कंपनीचे वेतन धोरण यांचा समावेश होतो. अनेक खासगी कंपन्यांमध्ये वार्षिक वेतनवाढ एक अंकी टक्केवारीत होते. त्यामुळे 5 ते 10 टक्के वाढ मिळाली तरी ती कर्मचाऱ्यांसाठी समाधानाची बाब मानली जाते. काही कर्मचाऱ्यांना मात्र पगारवाढीसाठी पुढील Appraisal cycle ची वाट पाहावी लागते. याच्या अगदी उलट, वोंग यांच्या बाबतीत वेतनात थेट 64 टक्क्यांची झेप घेतली आहे. त्यामुळे साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की, सामान्य कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे गणित वेगळे आणि देशाच्या पंतप्रधानांच्या पगाराचे गणित वेगळे का?

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपमध्येच 30 लाख रूपये महिना, कुणी उघडला पेटारा?

सिंगापूरमध्ये पंतप्रधानांना एवढा पगार का दिला जातो?

सिंगापूरमध्ये राजकीय नेत्यांना तुलनेने मोठे वेतन देण्याचे धोरण नवीन नाही. सरकारचा यामागील तर्क असा आहे की, देशाच्या कारभाराची जबाबदारी सक्षम आणि गुणवंत व्यक्तींवर सोपवायची असेल, तर त्यांना खासगी क्षेत्रातील CEO, वरिष्ठ बँकर्स आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक वेतन मिळणे आवश्यक आहे. उच्च वेतनाच्या धोरणामागे गुणवंत व्यक्तींना राजकारणात आकर्षित करणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न असल्याचे सिंगापूर सरकारकडून सांगितले जाते. म्हणजेच, या वेतनामागे केवळ पदाचा मान नाही, तर उच्च जबाबदारीच्या बदल्यात स्पर्धात्मक मोबदला देण्याची संकल्पना आहे.

64 टक्के वाढीवर प्रश्न का?

सिंगापूरमधील नागरिकांनाही महागाई, आर्थिक अनिश्चितता आणि रोजगाराशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागत असताना पंतप्रधानांना आधीच मोठे वेतन मिळत असताना त्यात एवढी मोठी वाढ का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः सामान्य कर्मचाऱ्यांना वर्षभर काम करून 5-10 टक्के वाढ मिळवण्यासाठी कामगिरी सिद्ध करावी लागते, तर देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या वेतनात थेट 64 टक्क्यांची वाढ होते, हा विरोधाभास चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

वाढीव 10.5 कोटी रुपये दान करणार

पंतप्रधान वोंग यांच्या घसघशीत पगार वाढीनंतर सिंगापूरमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार त्यांच्या पगारवाढीतून मिळणारी अतिरिक्त रक्कम ते स्वतःकडे ठेवणार नसून सामाजिक आणि कल्याणकारी कामांसाठी देणार आहेत. वोंग यांच्या म्हणण्यानुसार, वाढीव वेतनातील सुमारे 1.4 दशलक्ष सिंगापूर डॉलर म्हणजेच जवळपास 10.5 कोटी रुपये पुढील पाच वर्षांत सामाजिक आणि कल्याणकारी उपक्रमांसाठी दान केले जातील. त्यामुळे एका बाजूला पगारवाढीच्या निर्णयावर टीका होत असली, तरी दुसऱ्या बाजूला वाढीव रक्कम समाजासाठी वापरण्याच्या वोंग यांच्या निर्णयाचीही चर्चा होत आहे.

follow us