Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत (Weather Update) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आताही पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांव्यतिरिक्त सर्वच जिल्ह्यात पाऊस होईल. या पावसाचा फटका शेती पिकांना बसण्याची शक्यता आहे. विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबई पुण्यात मात्र पावसाची शक्यता नाही.
Rain Alert : सावधान! राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; ‘या’ भागात जोरदार बरसणार
आयएमडीच्या अंदाजानुसार 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान 15 राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, केरळ, झारखंड या राज्यांत काही ठिकाणी हलका पाऊस होईल असा अंदाज आहे.
हा पाऊस अवकाळी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई आणि पुण्यात पाऊस होईल अशी शक्यता नाही. जानेवारी महिन्यात दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर बरेच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र कालपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Weather Update : राज्याला भरली हुडहुडी! पुढील 5 दिवसांत ‘या’ राज्यांत थंडीची लाट; रेड अलर्ट जारी