Rain Alert : सावधान! राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; ‘या’ भागात जोरदार बरसणार

Rain Alert : सावधान! राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; ‘या’ भागात जोरदार बरसणार

Rain Alert : फेब्रुवारी महिन्यात राज्यातील वातावरण बदलत चालले आहे. थंडीचा जोर कमी होऊन (Rain Alert) आता उकाडा वाढत चालला आहे. सध्या पावसाची परिस्थिती नाही असे बोलले जात असतानाच पुन्हा पावसाचे संकट घोंगावू (Weather Update) लागले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अनेक राज्यांत अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. काही भागात गारपीट देखील झाली आहे. यानंतर आता राज्यातही जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. तसेच विदर्भातही काही जिल्ह्यांत पाऊस होईल अशी शक्यता आहे. अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. या काळात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नगर शहरात आता पावसाने विश्रांती घेतली असून वातावरणात उकाडा वाढत चालला आहे.

Rain Alert : सावधान! पुढील 48 तासांत अवकाळी कोसळणार; ‘या’ राज्यांना अलर्ट जारी

याआधी हवामान खात्याने मराठवाडा आण विदर्भात पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला. मराठवाड्यात पाऊस झाला. तर विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. काल विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या ठिकाणी पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे शनिवारी दुपारी गारपीट झाली. या गारपीटीमुळे शेतीतील पिकांचे मात्र नुकसान झाले.

हा पाऊस अवकाळी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई आणि पुण्यात पाऊस होईल अशी शक्यता नाही.  जानेवारी महिन्यात दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर बरेच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र कालपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस पुन्हा सुरू झाला आहे.  हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Weather Update : थंडी पळाली! 31 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; हवामानाचा अंदाज काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज