मोदींच्या वाक्याचा फडणवीसांना विसर; तीन सुपरवाईजर म्हणत जलील यांचा घणाघात

Imtiyaj Jaleel On Ajit Pawar :   राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे बोलले […]

Letsupp Image   2023 07 02T190039.093

Letsupp Image 2023 07 02T190039.093

Imtiyaj Jaleel On Ajit Pawar :   राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. यानंतर अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेअन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे.

आज महाराष्ट्रात ईडीचे सरकार स्थापन झाले आहे, त्यांच्याकडे आधी दोन सुपरवाईजर होते आता तीन झाले. मोदींनी चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी बद्दल काय बोलले होते,  हे जनता विसरलेली नाही, देवेंद्र फडणवीस विसरले असतील, असे म्हणत त्यांनी जलील यांना टोला लगावला.

मंत्रीपदं दिली, आणखी काय द्यावं शरद पवारांनी?, आव्हाड बंडखोरांवर संतापले

लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपच्या विरोधात मत दिले होते. आता तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान करत आहात.  मोदींनी चांगल काम केलं हे कळायला दादा तुम्हाला नऊ वर्ष लागले,जनतेला काही कळत नाही का, असे जलील म्हणाले.  महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही राहिले नाही. अजित पवार राष्ट्रवादीला तुम्ही फोडले आहे, सत्तेसाठी तुम्ही गेले असे कोणत्याही राज्यात घडत नाही. तुम्ही एमआयएमला बी टीम म्हणत होते, आता कोण गेले सत्तेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  आम्ही उद्या तुमचे अभिनंदन करण्यासाठी फटाके फोडणार असल्याचे जलील यांनी म्हटले.

‘मी साहेबांबरोबर…’, अजित पवारांच्या शपथविधीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…

पंतप्रधान मोदींनी आणि भाजप सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या डोक्यावर घेऊन बसले आहेत, सर्वात मोठे भ्रष्टाचारी तुम्ही आहात, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. दरम्यान, यानंतर  जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि प्रतोपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांनी असचं काही करायची गरज नव्हती. 6 तारखेला बैठक होती, आणि त्याआधीच त्यांनी बंड केलं. 25-25 वर्ष या लोकांनी मंत्रीपंद भोगली. आणखी काय द्यावं शरद पवारांनी यांना? त्यांचं सिल्वर ओक घरही द्यावं का? असा सवाल करत आव्हाड चांगलचे संतापले.

Exit mobile version