मंत्रीपदं दिली, आणखी काय द्यावं शरद पवारांनी?, आव्हाड बंडखोरांवर संतापले
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) थेट बंडखोरी करून आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना आज राज्यपाल रमेश बैस यांनी मंत्रीपदाची शपथ दिली. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीत मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि प्रतोपदी नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर लगेच आव्हाडांनी पत्रकार परिषदे घेत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. (Jitendra Awhads reaction to the NCP rebellion)
जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषदे बोलतांना सांगितलं की, बंडखोर आमदारांनी असचं काही करायची गरज नव्हती. 6 तारखेला बैठक होती, आणि त्याआधीच त्यांनी बंड केलं. 25-25 वर्ष या लोकांनी मंत्रीपंद भोगली. आणखी काय द्यावं शरद पवारांनी यांना? त्यांचं सिल्वर ओक घरही द्यावं का? असा सवाल करत आव्हाड चांगलचे संतापले. ते म्हणाले, ज्यांनी तुम्हाला मंत्रीपदं दिली. कुणाला महसुल मंत्री केलं. कुणाला अर्थमंत्री केलं. शरद पवारांकडे तुम्हाला पदांसाठी जावंही लागलं नाही. तर त्यांनीच फोन करून तुम्हाला मंत्रीपदं देऊ केली आणि अशा बाप माणसाला त्याच्या उतारत्या वयात हे दिवस दाखवणं, त्या बापाला अशा परिस्थितीत आणणं हे माणूसकीला शोभणारं नाही. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात एक दु:खाची छटा असेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांचं प्रमोशन, विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती
यानंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाकडे आहे, असं विचारल्यावर आव्हाड म्हणाले, सध्या राष्ट्रवादी पक्ष शऱद पवारांकडेच आहे. शरदचंद्र पवार हे एकच राष्ट्रवादीचे नेते आहेत. प्रदेशाध्यक्ष पद हे जयंत पाटलांकडे आहे आणि जयंत पाटलांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेते पदावर नियुक्ती केली त्यामुळं मी जो व्हिप काढेल, तोच लागू व्हाईल. अवघड स्थितीकडे संधी म्हणून पाहावं लागेल, असं आव्हाड म्हणाले.
दरम्यान, मी पवारांना सोडून कोठेही गेलो नसतो. सरकारसोबत जाण्यासाठी मला कोणीही विचारलं नाही. मी मेलो तरी शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचं आव्हाडांनी सांगिलतं.