Download App

‘पालकमंत्रिपदाची जबाबदारी नको…’, पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच धनंजय मुंडेंचा मोठा खुलासा

Dhananjay Munde On Ajir Pawar : राज्य सरकारकडून आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे अन्न, नागरी

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde On Ajir Pawar : राज्य सरकारकडून आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा नाव नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा खुलासा केला आहे. सद्यस्थितीमध्ये मला कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाऊ नये. अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे मी स्वतः केली होती अशी माहिती त्यांनी दिली आहे.  पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच त्यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.

बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो.

सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. असं धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांच्या टीकेला सामोरे जात असलेल्या सरकारने सावध भूमिका घेत धनंजय मुंडे यांचा पालकमंत्र्यांच्या यादीतून पत्ता कट केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

वाल्मिक कराड ‘इफेक्ट’, धनंजय मुंडेंना मोठा धक्का, बीडचे नवे पालकमंत्री अजित पवार

follow us