Download App

मंत्री गणेश नाईक यांचे जनता दरबारात रौद्ररूप; सिडको अधिकाऱ्यांना झापले, नोटिसा तात्काळ रद्द करण्याच्या सूचना

Minister Ganesh Naik Janta Darbar CIDCO officials scold : वनमंत्री गणेश नाईक यांचे (Ganesh Naik) जनता दरबारात रौद्ररूप पाहायला मिळाले. त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना झापल्याचं (CIDCO officials) समोर आलंय. त्यांनी सिडकोने नागरिकांना पाठवलेल्या नोटिसा तात्काळ रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात सुरू होता. त्यावेळी नवी मुंबईसह अनेक नागरिक आपल्या अडचणी घेणून पोहचले. नवी मुंबईतील तलवली गाव घणसोलीमधील नागरिकांना सिडको मार्फतघरांना आलेल्या नोटीसा (Ganesh Naik Janta Darbar) घेऊन जनता दरबारात पोहचले. यावेळी गणेश नाईक यांनी थेट सिडको अधिकाऱ्यांना सर्वांच्या समोरच झापले. आपण कोणत्या अधिकारात यांना नोटीसा काढल्या, तात्काळ नोटिसा मागे घ्या, तुम्हाला समजतं का, असे बोलतांना नाईक यांचे रौद्ररूप पाहायला मिळाले.

येत्या काळात केंद्रात सुळे तर राज्यात जयंत पाटील अन् रोहित पवार मंत्री होतील; लक्ष्मण हाकेंचा मोठा दावा

यावेळी उपस्थित नागरिक आणि अधिकारी शांत बसून पाहत (Maharashtra Politics) राहिले. यावेळी आलेल्या नागरिकांना आपल्या घरांवर कोणतीही कारवाई होणार नाही, झालीच तर गणेश नाईक बसला आहे, असे सांगताच नागरिकांनी समधान व्यक्त केले आहे. जनता दरबारात मात्र मंत्री गणेश नाईक यांनी सिडको अधिकाऱ्यांना चांगलेच झापले असल्याचं व्हिडिओमध्ये देखील पाहायला मिळालं.

‘भारत धर्मशाळा नाही…’, तमिळ निर्वासितांबाबत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मंत्री गणेश नाईक यांच्या या भूमिकेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अधिकाऱ्यांना तात्का नोटिसा मागे घेण्यास सांगितलं आहे. यावेळी गणेश नाईक अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले होते.

 

follow us