Minister Jaykumar Gores Leadership confirmed after BJPs victory in Solapur ZP Election after Municipal Council :
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने दमदार कामगिरी केल्यानंतर सर्वांचं लक्ष सोलापूर जिल्हा परिषदेकडे लागले होते. कारण येथे नगरपालिका निवडणुकांमध्ये अपयश आल्यानंतर भाजपने सावध भूमिका घेतली अन् महापालिका आणि जिल्हा परिषद हे दोन्ही किल्ले एकहाती सर केले. याचं सगळ श्रेय जात ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांना त्यामुळे सोलापूरात आता गोरेच डॉन असून त्यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. सोलापुरात भाजपला एकहाती सत्ता मिळवून देणाऱ्या गोरेंना मात्र बालेकिल्ला साताऱ्यात मात्र स्वकियांच्या पराभवाचा दणका बसला आहे. कसा होता सोलापूरातील गोरेंचा विजय अन् साताऱ्यातील स्वकियांच्या पराभव पाहूयात…
Video : अजितदादांबद्दलची मुंबईत न सांगितलेली गोष्ट रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन सांगितली…
गोरेंनी फडणवीसांची कमतरता त्यांनी भासू दिली नाही…
एकीकडे मंत्रीपदाची जबाबदारी असताना पक्षाचं काम देखील तेवढ्याचं प्रभावीपणे पार पाडण्याची भाजप नेत्यांची खासियत जय कुमार गोरेंमध्येही आहे. तशीच कामगिरी त्यांनी सोलापूरात केली. एकीकडे राज्याच्या ग्रामविकास विभागाचा कारभार करत पालकमंत्री यांनी अतिशय जातीने सोलापूर जिल्ह्याकडे जातीने लक्ष दिले.
शेतकरी आत्महत्या कायमच्या थांबणार, महाराष्ट्रात विशेष टास्क फोर्सची योजना
दुसरीकडे या निवडणुकीमध्ये प्रचाराचे आव्हान होते कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती दुर्दैवी निधन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील आपल्या सभा कॅन्सल केल्या. त्यामुळे या ठिकाणी भाजपला प्रभावी असा प्रचार करता आला नाही. सोलापूर जिल्ह्यातील सर्व जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आली. याचा फटका भाजपला बसेल का? तसेच अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा राष्ट्रवादीला होईल का? असं देखील बोललं जात होतं. मात्र गोरेंनी सर्वप्रथम सभा घेतल्या. कुठेही आपले नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कमतरता त्यांनी भासू दिली नाही.
मुर्दाड माणसाला कोण मारणार…? उत्तम जानकरांनी उडवली राम सातपुतेंच्या हत्येच्या आरोपांची खिल्ली
परफेक्ट नियोजनबद्ध आणि अतिशय आत्मविश्वास
परफेक्ट नियोजनबद्ध आणि अतिशय आत्मविश्वासाने पालकमंत्री जयकुमार गोरे हे महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेले. सोबतीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शहराचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना घेऊन त्यांनी 102 पैकी तब्बल 87 जागा भारतीय जनता पार्टीला मिळवत एक हाती वर्चस्व राखले. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक तशी सोपी नव्हती. अकरापैकी सहा आमदार हे विरोधात आहेत. तरीही भारतीय जनता पार्टी पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे गेली.
Video : दादांचा घातच! विमान कंपनीचा मालक पोहचलेला, आमचा मुख्य वैमानिकावर आक्षेप
अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण मध्ये आमदार सुभाष देशमुख, उत्तर मध्ये माजी आमदार दिलीप माने, शहाजी पवार, मोहोळ मध्ये राजन पाटील, यशवंत माने, माळशिरस मध्ये माजी आमदार राम सातपुते, पंढरपूरमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक, मंगळवेढ्यात आमदार समाधान आवताडे, सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटील, माढ्यात रणजितसिंह शिंदे, करमाळ्यात माजी आमदार संजय मामा शिंदे, बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंग केदार यांना सोबत घेऊन पालकमंत्र्यांनी ही निवडणूक हाताळली.
Video : भावनेच्या भरात… रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
अखेर सोमवारी जिल्हा परिषदेचे निकाल हाती आले. भारतीय जनता पार्टीने मुसंडी मारली आहे. या निकालावरून भाजपने जिल्ह्यात मुसंडी मारली असून जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर सुद्धा या निकालाने शिक्कामोर्तब केले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
कडेगाव-पलूसमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; विश्वजित कदम यांच्या नेतृत्व, संघटन आणि रणनीतीचा संगम
बालेकिल्ला साताऱ्यात मात्र स्वकीयांचा पराभव
दुसरीकडे मात्र जयकुमार गोरे यांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील मान खटाव तालुक्यात मात्र त्यांना स्वकीयांच्या पराभवाला सामोरे जावे लागले. कारण सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गोरे यांचे धाकटे बंधू अरुण गोरे आणि भावजयी भारती गोरे हे पराभूत झाले. तर दुसरे बंधू शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे याविषयी झाल्या. साताऱ्याच्या औंध गटात गोरे यांच्या गोरेंच्या भावजय भारती यांनी निवडणूक लढवली होती त्यांना राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरे यांनी आव्हान दिले होते. त्यात फडतरेंचा विजय झाला. दुसरीकडे कुकुडवाड गटात अरुण गोरे यांचा पराभव झाला. त्यामुळे बालेकिल्ल्यातच गोरेंच्या भाऊ भावजयी पराभूत झाल्याने हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. असंच म्हणाव लागेल
