Narayan Rane : माझं तोंड उघडलं तर मातोश्रीची दारं उघडणार नसल्याचं दम केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंना भरला आहे. खासदार गजानन किर्तीकर यांच्या ‘शिवसेना लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मुंबईतल्या सहारा हॉटेल येथे हा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते.
नारायण राणे(Narayan Rane) म्हणाले, आम्ही जेव्हा शिवसेना वाढवत होतो, तेव्हा उद्धव ठाकरे आठ वर्षांचा होता. उद्धव ठाकरेंनी आत्तापर्यंत एकाही आंदोलनात भाग घेतला नाही, शिवसेना जिंदाबादच्या घोषणा कधी दिल्या नाहीत, तो घाबरतो उच्चार स्पष्ट येईल की नाही, याची भीती असते अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली आहे.
Chandrayan 3 चं काम अंतिम टप्प्यात, विक्रम-प्रज्ञान स्लीप मोडच्या तयारीत; इस्त्रो प्रमुखांची माहिती
तसेच त्याकाळी शिवसेना आणि बाळासाहेबांविरोधात जो कोणी बोलेल त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्हाला झोप नसायची. आम्ही दोन दोन दिवस त्या माणसाच्या जिन्याखाली वाट पाहायचो. उद्धव ठाकरेनी कधी दोन तास तरी पाहिलीयं का? माझं तोंड उघडलं तर मातोश्रीची दार उघडणार नाहीत, असा सज्जड दमही नारायण राणे(Narayan Rane) यांनी यावेळी भरला आहे.
त्याकाळी मराठी माणसांनाही उद्धव ठाकरेंनी त्रास दिला असून मुंबईतील एअर इंडियाकडून महिन्याला 25 लाख रुपये मॅनेजर हरिहरण देत असल्याचा आरोप मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. आम्ही अनेकांनी रक्त सांडलं, माझ्यासोबतचे लोकं कोणी राहिलं नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
मराठा आरक्षण आंदोलकच आरोपीच्या पिंजऱ्यात : पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी 200 जणांवर गुन्हे दाखल
इंडिया बैठकीवर टीकास्त्र :
इंडिया बैठकीचं नियोजन कोणाकडे होतं याबद्दल मी माहिती घेतली तेव्हा समजलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे. इंडिया बैठकीचं हमालीचं काम उद्धव ठाकरेकडे आहे, त्या बैठकीला एक खासदार नसलेले पक्ष येत होते आणि नमस्कार घालत होतं, बाळासाहेबांनी सांगितलं कोणासमोर वाकायचं नाही आणि याचा वाकून बाण नसलेला धनुष्यबाण होतो, असंही ते म्हणाले आहेत.
‘डॉट असलेली आघाडी कधीच..,’; राहुल शेवाळेंनीही ‘इंडिया’ आघाडीला सोडलं नाही
दरम्यान, तुझ्याबरोबर ज्याने काम केलं त्यांच्याविषयी काय काय बोलतो? मुख्यमंत्री राहिलेला आणि बाळासाहेबांचा मुलगा आहे. मी रोज साहेबांसोबत बसायचो, सांहेब मला सांगायचे हा मनस्ताप देतोयं, उद्धव ठाकरेंनी जास्त जीभ चालवली तर तुझं सगळं बाहेर काढणार असल्याचा इशाराही राणे यांनी यावेळी दिला आहे. आज तर मी फक्त दोनच विषय सांगितलेत पण माझ्याकडे उद्धव ठाकरे यांचे 105 विषय आहेत. उद्धवजी एकच सांगतो राज्यात कुठं दंगल, अपघात झाला तर गेलात का तुम्ही? आता कोण आहे तुमच्याकडे फक्त तोंडाच्या घोषणा त्याच्यापलीकडे तुम्हाला येतच काय? अशी टोलेबाजी राणेंनी केली आहे.