MLA Bachchu Kadu On CM Ekanth Shinde : आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. ते म्हणाले की, त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या विनंतीनुसार मी मविआला पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिल्याने मी मंत्री झालो. मविआ काळात दिव्यांग मंत्रालय झालं असतं तर शिंदेंसोबत मी गेलो नसतो. बदलत्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. मंत्रिपदाचा दावा मी सोडणार होतो पण मुख्यमंत्र्यांचा फोन आला आहे. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. 17 तारखेला मी शिंदेंना भेटणार आहे. त्यानंतर 18 तारखेला मी माझी भूमिका मांडणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार भाजपाच्या गोटात का शिरले?; राऊतांनी केला ‘त्या’ घोटाळ्यांचा खुलासा
मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर सातत्याने नाराजी व्यक्त करणारे आमदार बच्चू कडू आरपारच्या मूडमध्ये आले होते. आज सकाळी 11 वाजता आपण पुढील वाटचालीसंदर्भात भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू असून अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. यामुळे बच्चू कडू नाराज झाल्याचे बोलले जात होते. पण मुख्यमंत्री शिंदेंसोबत झालेल्या बोलणीनंतर 18 जुलै रोजी आपण निर्णय जाहीर करणार असे कडू यांनी म्हटले आहे.
‘आमदारांंच्या कोटाची साईज बदलली, तरीही मंत्रीपद नाही’; राऊतांची खोचक टीका
कडू पुढे म्हणाले की, बच्चू कडू स्वतच्या व्यक्तिगत इच्छेसाठी कधी नाराज होणार नाही. आम्ही सामान्य माणसांसाठी लढू, त्यांच्यासाठी मरू पण स्वतसाठी नाराज होणार नाही, असे कडू यांनी सांगितले. कडू म्हणाले की, “आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालयासाठी भेटत होतो. तेव्हा दिव्यांग मंत्रालय झालं असतं, तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती. पण एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय तयार केलं. माझ्यासाठी ही आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. मी गुवाहाटीला जाण्यामुळे या देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय अस्तित्वात आलं. त्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर आयुष्यभर एकनाथ शिंदेंचे आभार मानत राहीन.”