Kiran Lahamte Car Accident : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोले येथून राजूरकडे जात असताना त्यांची कार आणि एका ट्रकची समोरासमोर धडक झाली. तालुक्यातील विठे घाट परिसरात हा अपघात झाला. या अपघातात आमदार लहामटे यांच्या कारचे नुकसान झाले तसेच त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. या अपघातात किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचार झाल्यानंतर लहामटे त्यांच्या राजूर येथील निवासस्थानी पोहोचले. या अपघातात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
बुलढाण्यात तिहेरी अपघात! 5 प्रवाशांचा मृत्यू, 24 जण जखमी; बोलेरो वाहनाचा चेंदामेंदा
रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.
दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे घडला, यात कुणाची चूक होती. ट्रक चालकाला पकडले का याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही. त्यामुळे याबाबत येथे चर्चा सुरू आहेत.