Download App

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; संदीप क्षीरसागर आक्रमक, बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय नेत्यांचा मूक मोर्चा

  • Written By: Last Updated:

Sandeep Kshirsagar Allegations In  Santosh Deshmukh Murder : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या ( Sarpanch Santosh Deshmukh Murder) हत्येमुळे संतापाचं वातावरण आहे. या हत्या प्रकरणाला 18 दिवस झालेत. परंतु अजून देखील याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. केवळ गंभीर आरोप होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमूख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मूक मोर्चा आहे. या पार्श्वभूमीच्या निषेधार्थ संपूर्ण शहरात बॅनर लागले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी गंभीर आरोप केले आहेत.

बीडमध्ये लागलेल्या बॅनर्सवर संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची (Beed News) हत्या, असा मजकूर लिहिण्यात आलाय. बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून उद्या सकाळी दहा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. यासंदर्भात बोलताना आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, घटना घडली, त्या दिवशी मी गावात गेलो होतो. गावातील लोकांनी मला आरोपींची नावं सांगितली आहेत.

धक्कादायक! तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती; पेट्रोल टाकून सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

संदीप क्षीरसागर म्हणाले की, गावातील लोकं घाबरलेले होते. परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये एक रोष होता. त्यांनी ज्या लोकांची नावं सांगितली, त्यांची बीडमध्ये दहशत आहेत. हे फक्त त्या गावापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यात (Crime News) रोष आहे. उद्याचा मोर्चा हा न्याय मिळवून देण्यासाठी आहे, असं संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केलंय. उद्या 28 तारीख असून देखील अजून आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

VIDEO : धनंजय मु्ंडेंच्या कार्यकर्त्याने खुलेआम केला हवेत गोळीबार, अंजली दमानियांचा CM फडणवीसांना गंभीर सवाल

यावेळी बोलताना संदीप क्षीरसागर यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. एकीकडे मुंडे आरोपींना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणतात, अन् दुसरीकडे संपूर्ण जिल्हा या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचं (Beed Crime) सांगत आहे. वाल्मिक कराडला ताब्यात दिलं पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, यात चुकीचं काय आहे? जिल्ह्यामध्ये खोटे गुन्हे देखील दाखल केले जात आहेत, असं सांगताना देखील आमदार संदीप क्षीरसागर दिसले आहेत.

बीडच्या घटनेबद्दल बोलताना काल धनंजय मुंडे म्हटले होते की, गुन्हेगार कोणीही असो, त्याला फाशी झालीच पाहिजे. माझं राजकारण आणि समाजकारण संपवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात असल्याचा आरोप देखील मुंडेंनी केला होता.

 

follow us