Download App

हिंदीच काय आता उर्दूही शिका, म्हणजे अतिरेक्यांचे…; आमदार संजय गायकवाड बरळले

आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय, तर राज्यात उर्दू सुद्धा शिकवल्या गेली पाहिजे. - आमदार संजय गायकवाड

  • Written By: Last Updated:

Sanjay Gaikwad : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terrorist attack) देशावर शोककळा पसरली आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना जशास तसा धडा शिकवावा, अशी मागणी होत आहे. तत्पूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने अजबच मागणी केली. आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय, राज्यात उर्दू सुद्धा शिकवली पाहिजे, अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली.

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानच्या आधीच भारताने केली क्षेपणास्त्र चाचणी… 

राज्यात काही दिवसांपूर्वी पहिलीपासून शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली होती, यावरून चांगलाच वाद झाला होता. मनसेने हिंदी भाषा सक्तीला जोरदार विरोध केला होता. हिंदी भाषा अनिवार्य केल्यास आंदोलन छेडू, असा पवित्रा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे जात सुधारित शासन निर्णय काढला होता. त्यामळं राज्यातील भाषेचा वाद तात्पुरता मिटला असला तरी आज माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी आता राज्यात उर्दू देखील शिकवली पाहिजे असं वक्तव्य केलं. माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले की, आज देशात कुठंही गेलं तरी हिंदीमध्ये बोलल्या जातं, इंग्रजीत बोलल्या जातं. माझं म्हणणं आहे की, छत्रपती संभाजीराजेंना 16 भाषा अवगत होत्या. मग तुम्ही त्यांच्या विचारांना लाथ मारणार आहात का? छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ हे बहुभाषिक होते. त्यांना सगळ्या भाषा यायच्या. आज आमचं महाराष्ट्रातील पोरगं जगात फिरत असेल तर त्याला जगाच्या भाषा आल्या पाहिजेत.

आम्ही सरकारसोबत, सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींचा सरकारला बिनशर्त पाठिंबा 

पुढं ते म्हणाले, एवढंच काय तर हिंदीचं काय तर आंतकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी राज्यात उर्दू सुध्दा शिकवली गेली पाहिजे, उर्दू भाषेत अतिरेकी संदेश पाठवत असतात. पण, आपल्याला उर्दू समजत नसल्याने ते पकडले जात नाहीत. म्हणून उर्दू देखील शिकवली पाहिजे, असं ते म्हणाले. दरम्यान, गायकवाड यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही एक अजब विधान केलं. राज्यातील पर्यटकांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला गेले आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक करताना म्हस्के म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी पर्यटकांना दिलासा दिला. त्यांना विमानतळावर आणले. अनेक पर्यटक रेल्वेने, बसने प्रवास करणारे आहेत. त्यांना शिंदे यांच्यामुळे पहिल्यांदाच विमानात बसता आले.

 

follow us