दिल्लीत हाचलाची वाढल्या, पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, मोठा धमका होणार?

दिल्लीत हाचलाची वाढल्या, पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, मोठा धमका होणार?

All-party meeting: पहलगाम दहशतवादी (Pahalgam attack) हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Minister Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सुरू झाली. या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेते सहभागी झालेत.

आधी व्हिसा रद्द अन् आता पाकिस्तानवर ‘क्रिकेट स्ट्राईक’, भारतात PSL चे टेलिकास्ट बंद 

सुरूवातीला दोन मिनिटे मौन
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, या बैठकीत सुरूवातीला बैठकीत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.
तसेच नेत्यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला.

या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचा संकल्प केला. दहशतवाद कोणत्याही किंमतीत खपवून घेतला जाणार नाही. दहशतवाद संपवण्यासाठी सरकार शक्य ते सर्व पाऊल उचलेल, असंही या बैठकीत ठरल्याची माहिती आहे.

या बैठकीत सर्व पक्षांनी एकत्रितपणे दहशतवादाचा निषेध केला आहे. भारत सरकारने दहशतवादाविरुद्धची लढाई तीव्र केली आहे. भारत सरकार दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी वचनबद्ध आहे, असा निर्धार या बैठकीत नेत्यांनी केला. दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

बैठकीला कोण कोण उपस्थित होते?

गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर नेते बैठकीला उपस्थित होते. याशिवाय राम गोपाल यादव (एसपी), सुप्रिया सुळे (एनसीपी-एसपी), श्रीकांत शिंदे (एनसीपी), प्रफुल पटेल (एनसीपी), प्रेम चंद गुप्ता (आरजेडी), तिरुची शिवा (डीएमके), सस्मित पात्रा (बीजेडी), संजय सिंग (आप), सुदीप बंदोपाध्याय (टीएमसी), मिथुन रेड्डी (वाईएसआरसी) आणि भाजपचे अनिल बलूनही देखील उपस्थित होते.

सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते गैरहजर
शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून कळवले आहे की, ते संसदीय स्थायी समितीच्या अधिकृत शिष्टमंडळासह देशाच्या विविध भागांच्या दौऱ्यावर असल्याने सरकारकडून आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत. याबाबत ठाकरे गटाच्या एक्स अकाऊंटवर माहिती देण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube