विकासकामांना गती! आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भातुकली तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

Yashomati Thakur

Yashomati Thakur

Yashomati Thakur : काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांनी भातकुली तालुक्यातील २८० लाखांच्या प्रलंबित विकासकामांना गती देत तालुक्यातील जळका, टाकरखेडा शंभू, साऊर, रामा, पोहरापूर्णा, पूर्णानगर, अंचलवाडी, निरूळगंगामाई,वाकी व ढंगारखेडा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. यावेळी गाव-खेड्यातील विविध प्रलंबित विकास कामांना गती मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी यशोमती ठाकूर यांचे आभार मानले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्रवारी आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भातकुली तालुक्यातील जळका येथे ५२ लाख रुपये, टाकरखेडा शम्भू येथे २० लाख, साऊर येथे २० लाख, रामा येथे ६४ लाख, पोहरापूर्णा येथे ५३ लाख, पूर्णा नगर येथे ३४ लाख, अंचलवाडी येथे १० लाख, निरूळगंगामाई येथे २० लाख, वाकी येथे १७ लाखांच्या व ढंगारखेडा येथील १० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड, जयंत देशमुख, श्रीकांत बोंडे, अभय देशमुख, मकद्दर पठान, नरेंद्र मकेश्वर, अभय वंजारी, रेखाताई सरोदे, अंकुश जुनघरे, प्रदीप शेंडे, विजुभाऊ मकेश्वर, वैकुंठ देशमुख, गजानन लांजेवार, गजुभाऊ ठाकूर, प्रभाकर धंदर, संजय खोडस्कर, दिलीप डहाके, मनिष देशमुख, दिलीप म्हस्के आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिवसा मतदारसंघात भाजपची अग्निपरीक्षा! यशोमती ठाकूरांविरोधात उमेदवार कोण?

 

Exit mobile version