तब्बल 99 वर्षांचं मोहिते पाटलांचं साम्राज्य संपवण्यासाठी भाजप मैदानात, काय आहे राजकीय गणित?

याच अकलूज ग्रामपंचायतची नगरपालिका झाली असून यंदा ही पहिलीच निवडणूक होत आहे. मोहिते पाटील यांना आव्हान देण्यात आलं.

News Photo   2025 11 16T150551.369

News Photo 2025 11 16T150551.369

एक दोन नाही तर तब्बल 99 वर्ष अकलूज ग्रामपंचायत आणि परिसरावर एक हाती सत्ता ठेवणाऱ्या मोहिते पाटलांना (Election) भाजपने नगरपालिका निवडणुकीत आवाहन दिलंय. महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही अकलूजमध्ये वेगळी चूल मांडल्याने मोहिते पाटील यांनाही निवडणूक सोपी झाली आहे. अकलूज म्हणजे मोहिते पाटील हे समीकरण इथं अनेक दशकापासून प्रस्थापित झालेलं आहे.

याच अकलूज ग्रामपंचायतची नगरपालिका झाली असून यंदा ही पहिलीच निवडणूक होत आहे. मोहिते पाटील यांना आव्हान देण्यासाठी यंदा भाजपने चांगलीच कंबर कसली असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कमळ चिन्हावर अकलूज नगरपालिका नगराध्यक्ष आणि 26 नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Video : विरोधकांना मोहिते पाटील हलक्यात का घेतात? रणजितसिंहांना सोबत घेणार का?,

हे सगळ सुरू असतानाच अशातच, भयमुक्त अकलूज आणि अकलूजचा विकास या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे सांगत आहेत. मात्र, महायुतीत सोबत असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक मास्टर स्ट्रोक खेळत मोहिते पाटील यांचे विरोधक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाला पक्षात प्रवेश देत घड्याळ चिन्हावर अकलूज नगर पालिकेची निवडणूक लढविण्याचे घोषीत केलं आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची नविडणुकही तिरंगी होण्याची चित्र आहे.

अकलूज आणि परिसरावर सलग 99 वर्ष एक हाती सत्ता अबाधित ठेवणाऱ्या मोहिते पाटलांना त्यामुळे ही निवडणूक सोपी जाणार असून, विरोधकांची मते विभागली जाणार आहेत. मोहिते पाटील यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूज सह जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यांच्यासाठी आता अकलूजची निवडणूक खूप सोपी बनली आहे.

अकलूज मध्ये सत्ता परिवर्तनासाठी माजी आमदार राम सातपुते यांनी माने पाटील आणि माने देशमुख असे मोहिते पाटलांचे विरोधक भाजपमध्ये आणत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अकलूज येथील व्यापारी डॉक्टर आणि सर्वांना भयमुक्त वातावरण देण्याचं आश्वासन भाजप देत आहे. त्यामुळे अकलूज नगरपालिकेची पहिली निवडणूक आरोप प्रत्यारोप आणि मोहिते विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे अशी रंगणार आहे.

Exit mobile version