Download App

राज्यात मुसळधार पाऊस, उष्णतेपासून मिळणार दिलासा, वाचा नवीन हवामान अंदाज

  • Written By: Last Updated:

Monsoon Rain Updates: राज्यात सध्या नागरिकांना उन्हाळ्यामुळे (summer) अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लोकांना दुपारी घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. राज्यातील काही भागात तापमानात (temperature) 40 अंश पेक्षा जास्तीची नोंद होत आहे. मात्र आता खाजगी कंपनी स्कायमेटने (Skymet) एक नवीन अंदाज वर्तवला आहे. या नवीन अंदाजानुसार राज्यात यावेळी चांगल्या पावसाची (Monsoon Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशात 102 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ यावेळी देशात सामान्य पाऊस राहणार आहे. तर भारताच्या मध्य आणि पश्चिम भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, सध्या पावसावर ‘अल निनो‘ चा परिणाम झाला आहे. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘ला निना’मध्ये बदल होणार आहे. या बदलत असणाऱ्या हवामानात देशात मान्सून येण्यास विलंब होऊ शकतो. असा अंदाज आहे की जूनमध्ये 95 टक्के एलपीए, जुलैमध्ये 105 टक्के, ऑगस्टमध्ये 98 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 110 टक्के मिळतील.

या राज्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता

स्कायमेटनुसार, देशातील 20 पेक्षा जास्त राज्यांत यावेळी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, लक्षद्वीपचा समावेश आहे.

येथे सामान्य आणि कमी पाऊस अपेक्षित  

एजन्सीने म्हटले आहे की बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये सामान्य पाऊस पडेल, तर आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीममध्ये कमी पावसाची शक्यता आहे.

उत्तर कर्नाटकातील वादळामुळे तापमानात घट: IMD

भारतीय हवामान विभागानुसार उत्तर कर्नाटकात एक-दोन दिवसांत वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून दक्षिण द्वीपकल्पीय भारतात उष्णतेची लाट होती मात्र आता येथे पावसाची शक्यता आहे.

follow us

वेब स्टोरीज