‘अल निनो’च्या इशाऱ्यानंतर सरकार अलर्ट; फडणवीसांनी सांगितला सरकारचा प्लॅन
Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्रातील 50 टक्के भागात कमी पाऊस पडतो. हा भाग अवर्षणप्रवण आहे. त्यातच आता अनेक हवामान संस्था हे वर्ष अल निनोचे (El Nino) असू शकते असा अंदाज व्यक्त करत आहेत. जर तसे असेल तर आपल्याला जलसंधारणाशिवाय पर्याय नाही. पाण्याचा थेंब न थेंब साठवावा लागणार आहे. वैरण विकास करावा लागेल. त्यादृष्टीने पाणी फाउंडेशन चांगले काम करत आहेत. त्यामुळे पाणी फाउंडेशन आणि आणखीही चांगले काम करणाऱ्या संस्थांना बरोबर घेऊन आम्ही काम करणार आहोत,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
हे ही वाचा : Maharashtra Drought : महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट, अमेरिकेतील हवामानविषयक संस्थेने व्यक्त केला अंदाज
फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की जलयुक्त शिवार (Jalyukta Shivar) योजनेत 20 हजार गावांत जलसंधारणाची कामे केली. त्यातून 37 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. त्यानंतर ही योजना बंद केली होती. आता आम्ही ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाच हजार गावे घेतली आहेत. या गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या क्षेत्रात पाणी फाउंडेशन (Paani Foundation) चांगले काम करत आहे. चाळीस हजार शेतकरी जोडले गेले आहेत. प्रशिक्षणाचे त्यांचे खूप चांगले आहे. याद्वारे शेतकरी स्वतः प्रशिक्षक होत आहेत. त्यांनी आता विषमुक्त शेती ही संकल्पनाही हाती घेतली आहे. या फाउंडेशनसह आणखीही ज्या चांगल्या संस्था आहेत त्यांच्याबरोबर सरकार काम करणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) जोरदार गारपीठ झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
मुंबईत अवकाळी पाऊस, वातावरणात गारवा
ही लाट राज्यातील विदर्भासह मराठवाड्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आता या दरम्यान राज्यावर थेट दुष्काळाचं सावट पडणार असल्याचाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अमेरिकेतील हवामानविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. नॅशनल ओशनिक अॅंड अॅटसॉस्पेरिक अॅडमिनिस्ट्रेशन ((National Oceanic and Atmospheric Administration) असं या संस्थेचं नाव आहे. यावर्षी महाराष्ट्रात एल निनोचा (El Nino) प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे मान्सूनवर (Monsoon) त्याचा परिणाम होणार आहे. जेणे करून राज्यात दुष्ळाळ (Maharashtra Drought) पडण्याची शक्यता आहे.