MP Nilesh Lanke Interview With Letsupp Marathi : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha) एक वर्ष पूर्ण झालंय. खासदारांच्या एक वर्षाच्या कारकीर्देच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) सडेतोड भाष्य केलं. त्यांनी सुपा एमआयडीसीवरून (Supa MIDC) विरोधकांवर हल्लाबोल केलाय. गंभीर आरोप देखील केले (Ahilyanagar News) आहेत.
सुपा एमआयडीसी
यावेळी बोलताना निलेश लंके यांनी म्हटलंय की, मी निवडणुकांच्यावेळी रोजगार देण्याच्या घोषणा केल्या आहेत. सुपा एमआयडीसीत गुंडगिरी चालते असे आरोप विरोधकांकडून केले जातात, यावर बोलताना निलेश लंके म्हणाले की, माझी दहशत आहे, तर मग उद्योजकांनी आरोप करायला हवे. पण उद्योजक म्हणतात निलेश लंकेंचं आम्हाला संरक्षण आहे. निलेश लंके यांचा सपोर्ट (Nilesh Lanke Interview With Letsupp Marathi) आहे. परंतु विरोधकांकडे काहीच भांडवल नाही, त्यामुळे उठसुठ सुपा एमआयडीसीतली गुंडगिरी बंद करायची. त्यांना वाटते निलेश लंके यांना सुपा एमआयडीसीतून रसद मिळते. पण कोणाकडून एक रूपया घेतला असेल ना, तर राजकारण सोडून देईल, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. या भागात औद्योगिकीकरण केवळ आदरणीय शरद पवार यांनी आणली आहे. सत्ताधाऱ्यांकडून अनेकदा डावपेच टाकले आहेत, ते त्यांच्या अंगलट आले आहेत, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.
मराठवाड्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, ‘हा’ मोठा नेता अजित पवारांच्या गळाला, प्रवेशही ठरला
सगळ्यात जास्त पॉप्युलर खासदार
पाच वर्ष आमदार म्हणून काम केल्यानंतर मला बऱ्यापैकी कामांची माहिती होती. पण राज्याचं काम आणि संसदेचं काम यात खूप फरक असतो. परंतु मला संसदेत गेल्यानंतर अडचण आली नाही. सुप्रिया ताई सगळं काम समजावून सांगतात. माझ्या माहितीनुसार संसदेत सगळ्यात जास्त पॉप्युलर खासदार सुप्रिया ताई आहेत, त्यांचे सगळ्यांसोबत चांगले संबंध आहेत, असंही निलेश लंके यांनी सांगितलंय. संसदेत मी जो प्रश्न मांडतो, तो मी मराठीतच मांडतो, जेणेकरून माझ्या मतदारसंघातील लोकांना त्यांचे प्रश्न पोहोचत असल्याचं समजलं आहे. मी शपथ इंग्लिशमध्ये घेतली कारण, तेव्हा माझी ओळख परेड असते. ती देशातील लोकं पाहात असतात, असं लंके यांनी म्हटलंय. इंग्रजी भाषा देशातील बऱ्यापैकी लोकांना समजते. आपली ओळख देशातील प्रत्येक भागामध्ये पोहोचली पाहिजे, हा यामागे हेतू होता. राहुल गांधींसोबत नेहमीच भेट होते, असंही लंके यांनी म्हटलंय.
‘पैसे बुडवले, धमक्या दिल्या…’, हगवणे कुटुंबीयांनी चित्रपट दिग्दर्शकांना फसवलं, थेट पुरावेच समोर
सेक्युलर विचारांचं सरकार
इंडिया आघाडीचं सरकार हे सेक्युलर विचारांचं सरकार आहे. ते सगळ्या प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवून चालते. सरकारकडून ज्या पद्धतीने निधी मिळतो, तसा मिळालेला नाही. पाच कोटी रूपयांचा निधी मिळतो. परंतु केंद्राच्या योजना आणण्याच्या काम करतो. राहुरी ते शनि शिंगणापूर रेल्वेला मंजूरी मिळाली, अशी माहिती लंके यांनी दिली आहे. परंतु नागरिकांच्या कामांना जास्त निधीची गरज आहे, अत्यंत तुटपुंजा निधी पुरवला जात असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलंय.
मेडिकल कॉलेज हा विषय आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. इतर विभागांना काट देऊन आरोग्याचं बजेट वाढलं पाहिजे, असं देखील निलेश लंके यांनी म्हटलंय. गरिबातल्या गरिबाला सुद्धा शासकीय हॉस्पिटलमध्ये चांगला उपचार मिळाला पाहिजे. मोठे ऑपरेशन मोफत झाले पाहिजे. आरोग्याच्या सक्षम योजना उभ्या राहिल्या पाहिजेत, अशी मागणी केल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.