Download App

अगोदर बुलडोझर चालवला अन् आता मागितली माफी; नागपूर हिंसाचारात हायकोर्टात शपथपत्र दाखल

मनपाच्या प्रशासकीय अधिकारी, नगररचना विभाग आणि झोपडपट्टी विभागाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची माहिती दावा या शपथपत्रात

  • Written By: Last Updated:

Nagpur Violence Case : नागपूर हिंसाचाराचा कथित मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवल्या प्रकरणी नागपूर महानगरपालिका आयुक्तांची हायकोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे. (Violence) फहिम खान याचं घर पाडल्या प्रकरणी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी हायकोर्टात शपथपत्र दाखल केलं असून कोर्टाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे.

नागपुरात 17 मार्चला झालेल्या हिंसाचार प्रकरणात फहीम खान हा कथित सूत्रधार असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून देशद्रोह आणि इतर गुन्हे फहिम खानवर लावण्यात आलं आहे. मनपाची नोटीस मिळाल्या नंतर फहिम खानची आई मेहरूनिस्सा यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, कोर्टात सुनावणीपूर्वीच मनपाने कारवाई करत त्याच्या आईच्या नावावर असलेलं घर बुलडोजर जर कारवाई करत पाडलं होते. बुलडोजर कारवाई पोलिसांच्या विनंतीवरून मनपाच्या झोपडपट्टी कायद्याअंतर्गत करण्यात आली.

मोठी बातमी! नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा; तपासात धक्कादायक माहिती

मनपाच्या प्रशासकीय अधिकारी, नगररचना विभाग आणि झोपडपट्टी विभागाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची माहिती दावा या शपथपत्रात करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2024 च्या आपल्या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टाने बुलडोझर कारवाईवर प्रतिबंध लावला आहे. आता या प्रकरणी हायकोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांनी कोर्टात बिनशर्त माफी मागितली. कोर्टाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देखील यावेळी आपल्या शपथपत्रात दिले आहे.

नागपुरातील हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी मास्टरमाईंड फहीम खान याच्यासह ५० दंगलखोरांवर गुन्हा दाखल केलं. याप्रकरणी फहीम खानला १८ मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर पोलीस कोठडी देण्यात आली. फहीम खानने स्वत: या प्रकरणात चुकीच्या प्रकारे गुंतविलं जात असल्याचा दावा याचिकेत केला होता. राजकीय बदला घेण्यासाठी त्याला गुंतवण्यात येत आहे.

follow us