मुंबई : एकीकडे ठाकरेंना राम राम करून शिंदेंच्या शिवनेतेत प्रवेश केलेल्या रवींद्र वायकरांवरून (Ravindra Waikar) राजकीय घमासान सुरू झाले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी (Nana Patekar) कोण वायकर असा प्रश्न उपस्थित करत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांकडून वायकरांबद्दल सविस्तर माहिती ऐकून घेतली. यावेळी नानांनी मला सर्वच पक्षातून मला ॲाफर असल्याचे सांगत तुम्ही मला कितीही प्रश्न विचारले तरी, मला पकडू शकत नसल्याचे सांगितले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. (Nana Patekar On Ravindra Waikar & Politics )
नाना पाटेकरांचा इन्कार तरीही राजकीय एन्ट्रीची चर्चा : शिरुरमध्ये अमोल कोल्हेंना आव्हान देणार?
गेल्या अनेक दिवसांपासून नाना पाटेकरांचे नाव लोकसभा निवडणुकांसाठी चर्चेत आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, – मला सर्वच पक्षातून ॲाफर आहे. पण मला ते जमणार नाही मी मूळात राजकारणात जाऊ इच्छित नाही आणि बाहेर असताना मला काय बोलायचे आहे. याबाबत क्लिअॅरिटी आहे पण राजकारणात गेल्यानंतर तिथे इतकं जपून बोलणं मला शक्य नाही. मला तोलून मापून बोलण शक्य नसल्याची कबुलीदेखील यावेळी नानांनी दिली. मी बाहेर असताना जेवढं काम करू शकतो तेवढं सत्तेत गेल्यानंतर करता येईल का? असा उलटं प्रश्न नाना यांनी पत्रकारांना विचारला.
Lok Sabha Election : राजकारणातील स्टार्स! काहींचं पॉलिटिक्स हिट तर काहींचं करिअरच ‘ब्रेक’
नेत्यांसमोर हात जोडणं जमतं पण…
पुढे बोलताना नाना म्हणाले की, विरोधी पक्षात, सत्तेत सगळीकडे आपली मंडळी आहेत. त्या सर्वांना आपल्याला हात जोडणं जमतं पण, मी जनतेपुढे हात जोडून म्हणणार नाही की, निवडणुकीत तुम्ही मला मतं द्या. मी कधी निवडणुकीत उभं राहणार नाही ती गोष्ट वेगळी आहे. मी नुसता उभा आहे असं म्हटल्यानंतर निवडून देता आलं पाहिजे इतकं तुमचं काम छान असायला पाहिजे. तुमच्याबद्दल विश्वास असायला पाहिजे.
कोल्हेंना खासदार करणे ही आमचीच चूक; सेलिब्रेटी उमेदवारांवरून शिरूरमध्ये अजितदादांची जोरदार बॅटिंग!
अन् नाना थेटचं म्हणाले वायकर कोण?
यावेळी नानांना काल (दि.10) शिवसेनेत जाहीर प्रवेश झालेल्या रवींद्र वायकरांबद्दल विचारण्यात आले. विरोधकांना निधी देत नसल्याने आम्ही विकास कामांसाठी सत्तेत जात असल्याचा संदर्भ नानांना देण्यात आला. त्यावेळी नानांनी वायकर कोण असा प्रतिप्रश्न पत्रकारांना विचारला. त्यावेळी उपस्थित पत्रकार मंडळींनी वायकर म्हणजे माजी मंत्री असल्याचे सांगितले. त्यावर मला काहीच माहिती नसल्याचे सांगत मला गावखेड्यातील माणसांची नावं विचारली तर सांगता येईल पण इथे ही मंडळी कोण आहेत हे मला खरचं माहिती नसल्याचे नाना म्हणाले.
तु एकदा घरी ये… राजकाणाबद्दल विचारता नांनांची ऑफर
यावेळी नानांना सध्याच्या राजकारणावर आपलं काय मत असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नानांनी पत्रकाराला तु एकदा घरी ये ना अशी खुली ऑफर दिली. मुळात मी राजकारणात जाऊचं शकत नाही असे म्हणत तुम्ही कितीही आलटून पलटून प्रश्न विचारले तरी, तुम्ही मला पकडू शकत नसल्याचे नाना पत्रकारांना म्हणाले.
Nana Patekar On Politics: निवडणूक लढवण्यावर नाना पाटेकर यांचे मोठं वक्तव्य…#NanaPatekar @nanapatekarS #Politics #PoliticsLive #MaharashtraLive pic.twitter.com/y2DbjSsJzt
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 11, 2024