Download App

भाजपला संविधान बदलायचंय; ‘त्या’ लेखाच्या आधारे पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole : घटना बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपला जनता माफ करणार नाही. तर पंतप्रधान पुन्हा निवडून येण्याबद्दल बोलले ते म्हणजे जे देवेंद्र फडणवीस बोलले आहेत तेच नरेंद्र मोदी बोलले आहेत. मात्र लोक त्यांचा गर्व हरण करतील. तर भ्रष्टाचाराचा कळस करणारे लोक लाल किल्ल्यावर बोलत आहेत. अशी टीका नाना पटोले यांनी केली. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

‘मोदींनी, देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घ्यावं’, पुन्हा येईनच्या घोषणेवर पवारांची खोचक टीका

भाजपच्या विवेक देबेराय यांचा एक लेख आला आहे. त्यांनी सांगितले आहे. देशाची घटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे. इंग्रजांच्या विचारांची आहे. 2047 पर्यंत भारताला नवीन घटना हवी असे लिहिले आहे. त्यांनी असा दावा केला आहे. रंजन गोगाई यांनी पण सांगितले आहे की, भारतीय राज्य घटना बदलायची आहे. असे त्यांनी सांगितले आहे. हे भाजपाचे खासदार आहेत. त्यामुळे या लोकांना देशातील जनता माफ करणार नाही.

राज्यात काँग्रेस पदयात्रा काढणार...

पुढे पटोले म्हणाले की, आज राज्यात पाऊस नाही. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे . वीज व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष राज्यात आंदोलन करणार आहे. अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले होते. त्यावर आद्याप मदत मिळाली नाही. राज्यात 36 जिल्हे आहेत. पण 19 मंत्री आहेत. अनेक जिल्हात पालकमंत्री नाहीत. त्यामुळे कामे होत नाहीत. प्रशासन यांचा भ्रष्टाचार वाढला आहे. तीन पक्ष आज राज्याच्या जनतेच्या पैशांची मलाई खात आहेत. जास्त परीक्षा फी आकारली जात आहे. या माध्यमातून लूट चालू आहे. त्यामुळे येत्या 3 तारखेला संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्ष पदयात्रा काढणार. अशी माहिती पटोलेंनी केली.

मनूपेक्षा तुकाराम, ज्ञानेश्वरांना छोटे म्हणणारा भिडे ‘त्यांचा’ गुरुजी; जितेंद्र आव्हाडांचा रोख कोणाकडे?

तसेच MVA म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. 40 ते 45 जागा आमच्या लोकसभेच्या येतील. असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान पुन्हा निवडून येण्याबद्दल बोलले ते म्हणजे जे देवेंद्र फडणवीस बोलले आहेत तेच नरेंद्र मोदी बोलले आहेत. मात्र लोक त्यांचा गर्व हरण करतील. निवडणुकीचे जास्त जे सर्वे होत ते इंडियाच्या बाजूने पहिला मिळत आहेत. तर भाजपच्या मंत्र्यांच्या मुलांना उमेदवारी न देण्याच्या मुद्द्यावर पटोले म्हणाले, भाजपच्या या वाक्याला काहीही अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांचा यांचा मुलगा खासदार आहे. कुणा कुणाला ते काढणार आहेत. त्यांच्या या वाक्यावर कुणाचा भरोसा राहिला नाही. भ्रष्टाचाराचा कळस करणारे लोक लाल किल्ल्यावर बोलत आहेत.

भरत गोगावलेंच्या वक्तव्यावर पटोले म्हणाले की, भय आणि भ्रष्टाचार या माध्यमातून मी सरकार निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात त्यांचे आमदार असे बोलत आहेत. पहिले ED सरकार होते आता EDA झाले आहे. हे सरकार वेड आहे. बच्चू कडूंचा भाजप राष्ट्रवादीच्या बद्दल काय अभ्यास माहित नाही. पण भाजप हे शेतकरी विरोधी आहे. शिर्डी शासन आपल्या दारीमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. योजना जुन्याच आहेत फक्त नाव बदलले आहे. संपूर्ण जिल्हा नियोजन समितीच्या पैसेची उधळपट्टी केली जात आहे. तर यावेळी पटोलेंनी शरद पोंक्षेंवरही टीका केली.

Tags

follow us