‘मोदींनी, देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घ्यावं’, पुन्हा येईनच्या घोषणेवर पवारांची खोचक टीका

‘मोदींनी, देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घ्यावं’, पुन्हा येईनच्या घोषणेवर पवारांची खोचक टीका

Sharad Pawar on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असं सांगिलतं. पण, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, ते पण असंच म्हणत होते. मला मोदींना सांगायचं की, पुन्हा येण्यापूर्वी एकदा देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घ्या, अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली.

राष्ट्रवादीतील बंडाळी नंतर शरद पवारांनी दौरे सुरू केले. आज बीडमध्ये राष्ट्रवादीची सभा झाली. त्यावेळी ते जनतेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, दिल्लीतील 15 ऑगस्टच्या भाषणात बोलतांना पंतप्रधान मोदींनी मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन, अशी घोषणा केली. मात्र माझं एकच सांगण आहे की, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते. त्यांच नाव देवेंद्र फडणवीस. त्यांनीही मी पुन्हा येईल, पुन्हा येईनची घोषणा दिली होती. त्यांनी घोषणा केली आणि ते पुन्हा आले पण, उपमुख्यमंत्री म्हणून. आता ही जी घोषणा तुम्ही केली, ती पूर्णत्वास नेण्यासाठी देवेंद्र फडणवीसाचं मार्गदर्शन घ्या, आणि पंतप्रधान पदाच्या खालील कोणत्या पदावर यायचं ते ठरवा, अशी खोचक टीका पवारांनी केली.

मनूपेक्षा तुकाराम, ज्ञानेश्वरांना छोटे म्हणणारा भिडे ‘त्यांचा’ गुरुजी; जितेंद्र आव्हाडांचा रोख कोणाकडे? 

दोन दिवसांपूर्वी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतांना मोदींनी पुढच्या वर्षी पुन्हा येईनचा नारा देत आगामी निवडणुकांचे रणशिंग फुकले. दरम्यान, याच वक्तव्याचा पवारांनी निशाणा साधला.

मणिपूर हिंसाचारावरून शरद पवारांनी मोदींना खडे बोल सुनावले. मणिपूरमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. समाजासमाजात भांडणं झाली. स्त्रीयांची धिंड काढली गेली. मात्र, देशातील सरकार काही स्वस्थ आहे. सरकार कोणतीही कारवाई करत नाही. देशाच एक भाग सतत जळत असतांना पंतप्रधानांनी मणिपूरमध्ये जायला हवं होतं. मात्र, पंतप्रधान तिकडे ढुकंणही गेले नाही. मणिपूर हिंसाचारावरून अविश्वासचा ठराव आल्यावर ते काही मिनिट बोलले. पण, महिलांचं दुख समजून घेतलं नाही, अशी टीका पवारांनी केली.

ते म्हणाले, केंद्रावर विश्वास ठेऊन चालणार नाही. लोकांनी निवडुण दिलेली सरकार पाडली जातात. गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील सरकार पाडली गेली. स्थिर सरकार स्थापन करण्याची घोषणा सरकार करतं. मात्र, केंद्र सरकार राज्य सरकारं पाडतं. लोकांनी निवडून दिलेली सरकारं पाडली जात आहे. सत्ताधारी योग्य पध्दतीने वागत नाहीत, सत्तेचा आणि तपास यंत्रणांचा गैरवापर करून लोकांना तरुंगात डांबल जातं. हे सुडाचं राजकारण उलथून टाकण्यासाठी वेळ लागणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube