Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील सरकारमुळे सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला म्हणत. त्यावरून शिंदे-फडणवीस यांच्यावरती टीका केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांना देखील टोला लागला आहे. पटोले म्हणाले की, अजित पवारांच्या हातात काही नाही. फक्त बोलावं लागतं म्हणून ते बोलतात.
डोक्यावर ग्लास अन्…; प्राजक्ता माळीने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला 31 डिसेंबर, Video Viral
माध्यमांशी संवाद साधत असताना नाना पटोले यांनी विविध प्रश्नांवर उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला हलवला या विषयावर बोलताना पटोले म्हटले की, एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस हे दोघेही सरळ सरळ खोटे बोलतात. त्यांना राज्य बकाल करायच आहे. उध्वस्त करायचा आहे. हाच फॉर्म्युला या येड्यांच्या सरकारचा आहे. यावरून हे स्पष्ट दिसत आहे की, सरकार महाराष्ट्राला बरबादीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. तरी या प्रकल्पाबाबत अजित पवार यांच्या हातात काहीही नाही. मात्र त्यांना फक्त बोलावं लागतं म्हणून ते बोलतात. असा टोला देखील यावेळी नाना पटोले यांनी लावला आहे.
झारखंड सरकारवर ‘ईडी’चा बुलडोझर; मुख्यमंत्री हेमंत सोरेन राजीनाम्याच्या तयारीत
त्याचबरोबर यावेळी पटोले यांनी ट्रक चालकांच्या संपावरून देखल टीका केली. ते म्हणाले वाहन कायदा हा सरकारचा तुकलकी निर्णय आहे. यामुळे संपूर्ण देशातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. वाहन चालकांसाठी केलेला हा कायदा काळा कायदा असून त्यामुळेच त्याच्या विरोधात सर्व चालक हे रस्त्यावर उतरले आहेत. जन जीवन विस्कळीत ठेवण्याचे काम तानाशाही प्रवृत्ती म्हणजेच या केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जातं आहे. जनजीवन विस्कळीत व्हावं प्रभावित व्हावं असा प्रयत्न जाणून-बुजून भाजप करत आहे.
तर यावेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर बोलताना पटोले म्हणाले की, जागा कुणाला कमी किंवा जास्त मिळतात यापेक्षा तानाशाही प्रवृत्ती, लोकशाहीला ना मानणार, बीजेपी सरकारला आम्हाला हद्दपार करायचा निर्णय झाला आहे. प्रकाश आंबेडकर यांचं शरद पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. आमच्याशी आंबेडकरांचे बोलणं झालेलं नाही. दिल्लीत बैठक घेण्याबाबतचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या सर्व विषयावर चर्चा दिल्लीत केली जाईल. अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.