डोक्यावर ग्लास अन्…; प्राजक्ता माळीने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला 31 डिसेंबर, Video Viral

डोक्यावर ग्लास अन्…; प्राजक्ता माळीने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला 31 डिसेंबर, Video Viral

Prajakta Mali Video Viral: ‘जुळून येती रेशीमगाठी’ या सिरीयलमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) घराघरांत लोकप्रिय झाली. मालिका विश्वात यश आजमावल्यावर अभिनेत्रीने अनेक चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केलं. ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने सूत्रसंचालिका म्हणून तिला एक अनोखी ओळख मिळवून दिली. अलीकडेच प्राजक्ता मुख्य भूमिकेत असलेला ‘तीन अडकून सीताराम’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. ती सोशल मीडियावर (social media) प्रचंड सक्रिय असते. अभिनयाव्यतिरिक्त प्राजक्ताचे व्यवसाय, फोटोशूट याची सर्वाधिक चर्चा रंगते. 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस आपण कसा साजरा केला हे तिने दाखवलं आहे. तिने आपल्या कुटुंबासोबत धमाल केली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)


प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडिओत तिचं संपूर्ण कुटुंब धमाल करताना दिसतंय. ते सर्वजण ऍनिमल मधील बॉबी देओल याच्या ‘जमाल कुडू’ या गाण्यावर थिरकताना दिसतायत. सगळेच डोक्यावर ग्लास आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन खूप धमाल करताना दिसतायत. प्राजक्ता देखील त्यांच्यासोबत चांगलीच मजा करत आहे, तर तिचे वडील ‘डॉन’ मधील गाण्यावर थिरकताना दिसतायत. त्यानंतर आपली मराठीमोळी अभिनेत्री चुलीवर स्वयंपाक बनवताना दिसत आहे.

ती भाकऱ्या बनवण्यासाठी पीठ मळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं आहे की, ’31डिसेंबरबद्दल सर्वकाही. आमचे बॉबी देओल आणि डॉन. मॅडनेस, यासोबत 2023वर्षाचा शेवटचा आणि 2024चा पहिला सेल्फी फोटो एकत्र केला आहे. चुलीवरचं जेवण, डान्स, पार्टी. या वर्षाची पहिली पोस्ट, नवीन वर्षाच्या शुभेच्छा.’ तिचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल झाला आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. कुटुंबासोबत घालवलेला वेळ हीच खरी मज्जा असते असं ते म्हणाले आहेत. एकूणच या वर्षातही प्राजक्ता नवनवीन गोष्टी करत राहणार हे नक्की. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ जोरदार चर्चेत आला आहे. तिच्या साध्या राहणीमानच चाहते तोंडभरून कौतुक करत आहेत.

आजोबांच्या प्रश्नावरून अभिनेत्रीने आजीशी घातला वाद, उत्तर ऐकताच पाहण्यासारखा होता चेहरा

दरम्यान, प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘तीन अडकून सीताराम’ या मराठी सिनेमात झळकली होती. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, अलोक राजवाडे असे अनेक कलाकार बघायला मिळाले होते. तसेच प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून सूत्रसंचालिकेच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस येत असते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज