Download App

Nanded Civil Hospital Death : खुनी सरकार म्हणत सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांनी शिंदे सरकारला घेरले

  • Written By: Last Updated:

मुंबई : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात काल (दि. 2) 24 रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर दुसऱ्यादिवशी आणखी 7 रूग्णांचा मृत्यू झाल आहे. यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना शिंदे सरकारला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे करत हल्लाबोल केला आहे. राज्यातील तीन इंजिनचं सरकार हे खूनी सरकार असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) यांनी म्हटले आहे. (Supria Sule Vijay Waddetiwar On Nanded Civil Hospital Death)

Nanded Hospital Deaths : मृत्यूचे तांडव सुरूच! सरकारी दवाखान्यात आणखी 7 मृत्यू; मृतांचा आकडा 31 वर

हे सरकार अतिशय असंवेदनशील असून, शेतकऱ्यांच कंबरड मोडण्याचा घाट या सरकारने घातल्याचेही सुळेंनी यावेळी हल्लाबोल करताना म्हटले आहे. ज्या आईनं आपलं मूल गमावल आहे, त्या आईला सरकारने विचाराव तिच दुःख काय आहे? संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे अशी मागणीही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. हे बळी नसून खून असल्याचे म्हणत महाराष्ट्र सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असेही सुळे यावेळी म्हणाल्या.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले असल्याचे राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Waddetiwar) यांनी म्हटले आहे. नांदेड मेडिकल कॉलेजमध्ये 24 जणांचा मृत्यू त्यात 12 नवजात बालके होती. हे शासन पुरस्कृत मृत्यू असून या घटनेला शासन जबाबदार आहे. ठण्यामधील घटना ताजी असताना ही घटना घडली. या मागची करणे गंभीर असून, त्या रुग्णालयात डीन पूर्णवेळ नाही अनेक पदे रिक्त आहेत. औषध पुरवठा बरोबर नाही. सर्जन नाही असे एक ना अनेक कारण वडेट्टीवरांनी यावेळी बोलून दाखवली.

अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल, नांदेडच्या घटनेवरून जयंत पाटलांची सरकारवर सडकून टीका

नांदेड घटनेवरून राज ठाकरेंनीही घेरले

नांदेडमधील रूग्णांच्या वाढत्या मृत्युनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील (Raj Thackeray) राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा असल्याचेही त्यांनी नमुद केले आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय.

या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ? असा संतप्त सवाल राज यांनी राज्य सरकारला विचारला आहे.  सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं.

Tags

follow us