अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल, नांदेडच्या घटनेवरून जयंत पाटलांची सरकारवर सडकून टीका

  • Written By: Published:
अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल, नांदेडच्या घटनेवरून जयंत पाटलांची सरकारवर सडकून टीका

Jayant Patil On Nanded Patients Death : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Dr. Shankrao Chavan Medical Hospital) व रुग्णालयात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासांत हे मृत्यू झाले आहेत. त्यात बारा नवजात बालकांचा समावेश आहे. या रुग्णांना औषधे न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोपही नातेवाइकांनी दिला आहे. हाफकिन संस्थेकडून औषध खरेदी होत नसल्याने सरकारी रुग्णालयांत औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहेत. नांदेडमधील घटनेनंतर विरोधकांनी आता सरकारला धारेवर धरण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नांदेड येथील घटनेनंतर सरकारवर सडकून टीका केली आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या एक्स अकाउंटवर म्हटले की नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात चोवीस तासात तब्बल 24 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर नांदेडहून येणारी बातमी वेदनादायी असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

नांदेड दुर्घटना! नर्सेसच्या बदल्या, डॉक्टरांची कमतरता; चव्हाणांनी सांगितली सत्य परिस्थिती

रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला. रुग्णांना वेळेवर औषधे पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. जितकी कार्यक्षमता स्वतःच्या प्रचारासाठी, विरोधी पक्ष फोडण्यासाठी वापरता, तितकी कार्यक्षमता जर कामाप्रती दाखवली असती तर ही परिस्थिती आली नसती, असा आरोपही जयंत पाटलांनी सरकारवर केला आहे.

नांदेडमध्ये 24 तासात 24 मृत्यू! हाफकिनकडून औषध खरेदी का बंद केली, पर्यायी व्यवस्था कोणती उभारली?

जयंत पाटलांचा हा निशाणा भाजपवर होता. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आज अनेक आयांनी आपली लेकरे गमावली आहेत. त्यांच्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल, अशी सडकून टीकाही जयंत पाटलांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रुग्णालयामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नांदेडमध्ये दुर्घटना झाली आहे. त्यामुळे सरकारवर आता विरोधक तुटून पडू लागले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube