Uddhav Thackeray : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आयोजित जाहीर सबेत बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभेत बोलताना त्यांनी नाशिकच्या विकासावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, आज नागरिकांसाठी काम करणारे दोन भाऊ एकत्र आले आहे. अनेक पराभव पचवले पण शिवसेना संपली नाही. भाजपचं (BJP) हिंदुत्व हे चुनावी हिंदुत्व आहे का? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला. तसेच फोडाफाडीच्या राजकारणावरुन देखील या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत तुमची राजकीय अपत्य वाढवा असा टोला भाजपला लावला. भाजप उपटसुंभाचा पक्ष झालाय. भाजपच्या निष्ठावंतांना बरबटलेल्या लोकांना डोक्यावर घ्यावं लागतंय असं देखील या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. तर आमचा वचननामा हा ठाकरेंचा शब्द आणि ठाकरे जे बोलतात ते करतात. राजकारणात पोरं होत नाहीत म्हणून आमचे दत्तक घेताय असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका; निकालाआधीच 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश अन् जाहीर पाठिंबा
या सभेत पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप दलालांचा पक्ष आहे. भाजपने अकोटमध्ये एमआयएमसोबत युती केली तर अंबारनाथमध्ये काँग्रेसमध्ये भाजपने युती केली तेव्हा तुमचा हिंदुत्व कुठे गेला होता असं म्हणत भाजपने पाठीत वार केल्याने काँग्रेससोबत गेलो असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. तर भाजपात ईडीग्रस्त लोक प्रवेश करत असल्याचा दावा नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आयोजित जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
